Breaking
ब्रेकिंग

अल्प वयीन मुलीचा विहिरीत बुडून मृत्यू ; गोंदेगांव, विंचूर, जातेगांव परिसरात शोककळा

0 5 2 3 7 7

दीपावली सुट्टीसाठी जामदरी येथे मामाच्या गावी गेलेल्या १२ वर्षीय चिमुरडीचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू ; धुणे धुण्यासाठी विहिरीवर गेली असताना दुर्घटना

शिरवाडे वाकद, दि. १५ नोव्हेंबर :- निफाड तालुक्यातील गोंदेगाव येथील अवघ्या १२ वर्षीय चिमुरडीचा नांदगाव तालुक्यातील जामदरी येथे विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवार, दि.१५ सकाळी घडली.
कु.पूजा भरत भोसले (वय १२, रा. गोंदेगाव, ता. निफाड) असे मृत बालिकेचे नाव आहे. या घटनेमुळे गोंदेगावसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कु.पूजा भोसले ही दिवाळीच्या सुट्टीनिमित्त आपल्या मामाच्या गावी जामदरी (ता. नांदगाव) येथे गेली होती. रविवारी सकाळी सुमारे नऊ वाजेच्या सुमारास ती आपल्या बहिणीसोबत मामाच्या घरामागील विहिरीवर धुणे धुण्यासाठी गेली होती. यावेळी अचानक पूजा विहिरीत पडल्याने ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली.
या दुर्दैवी घटनेत पूजाचा मृत्यू झाला. याप्रकरणी नांदगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील कार्यवाही सुरू आहे. दिवाळीच्या आनंदासाठी मामाच्या गावी गेलेल्या चिमुरडीचा अशा प्रकारे अंत झाल्याने भोसले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 2 3 7 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे