आरोग्य व शिक्षणसामाजिक
किम्स मानवता हॉस्पिटलतर्फे जागतिक किडनी दिनानिमित्त विशेष जनजागृती

0
3
2
1
2
3
नाशिक, १३ मार्च –
जागतिक किडनी दिनाचे औचित्य साधून, किम्स मानवता हॉस्पिटल, नाशिकतर्फे किडनी विकारांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी व किडनी आजाराने ग्रस्त रुग्णांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात डॉ. मोहन पटेल, वरिष्ठ किडनी रोग व किडनी प्रत्यारोपण तज्ञ तथा किम्स मानवता हॉस्पिटल, नाशिक येथील विभागप्रमुख यांनी उपस्थितांना किडनी आजारांचे वेळीच निदान, जीवनशैलीतील सुधारणा आणि आधुनिक उपचार पद्धतींबाबत सखोल माहिती दिली.
तसेच आहार तज्ञ पिया हळदंकर यांनी किडनी आजार असलेल्या रुग्णांसाठी योग्य आहाराविषयी मार्गदर्शन केले. डॉ. निलेश सिंग, सीओओ, किम्स मानवता हॉस्पिटल यांनी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध अत्याधुनिक किडनी उपचार सुविधा आणि किडनी रुग्णांसाठी सवलतीच्या उपचार योजनांविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचा सांस्कृतिक विभागही विशेष आकर्षण ठरला जिथे गायक सचिन बेडीस यांनी सुंदर गाण्यांनी उपस्थितांची मने जिंकली, तर अभिनेते प्रकाश भगवत यांच्या धमाल विनोदांनी वातावरण हलकंफुलकं केलं.
या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मंगेश दळवी, गेब्रियल स्वामी, विश्वानंद साळवे , अपूर्वा गिरडकर आणि प्रतीक कठाळे यांनी विशेष मेहनत घेतली.
0
3
2
1
2
3