कृषीवार्तासामाजिक
निफाड येथे बी.एम.ए. ट्रॅक्टर हाऊसचे उद्घाटन
0
4
2
9
5
7
शेतकऱ्यांनी आधुनिक तंञज्ञानाने शेती करावी- मोहन आढांगळे
निफाड येथे बी.एम.ए. ट्रॅक्टर हाऊसचे भव्य उद्घाटन
सागर निकाळे -निफाड प्रतिनिधी-
शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि आधुनिक शेतीला चालना देण्यासाठी बी.एम.ए. ट्रॅक्टर हाऊसची नवीन शाखा निफाड येथे सुरू करण्यात आली. या शाखेचे उद्घाटन बी.एम. ग्रुपचे संस्थापक मोहनभाऊ आढांगळे व भालचंद्र माने यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात शेतकऱ्यांना आधुनिक ट्रॅक्टर व त्याच्या वापराबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे ही आजच्या काळाची गरज असून ट्रॅक्टर हे शेतकऱ्यांचे विश्वासू साथीदार असल्याचे मत मोहनभाऊ आढांगळे यांनी व्यक्त केले.निफाड परिसरातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेली ही शाखा मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधवांना लाभदायी ठरणार असून भविष्यातील शेतीसाठी ही पायाभूत सुविधा ठरेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.
0
4
2
9
5
7



