कृषीवार्तामहाराष्ट्रशासकीय
शेत नोंदणी करण्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी जगदीश पाटील यांचे आवाहन

0
2
5
6
2
9
सन 2024-25 या वर्षामध्ये निर्यातक्षम आंबा पिकांची मॅगोनेट प्रणालीव्दारे शेत नोंदणी करण्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी जगदीश पाटील यांचे आवाहन
इगतपुरी (प्रतिनिधी)…
नाशिक जिल्हा द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. या फळपिकांसमवेत आंबा पिकाचे क्षेत्र देखील नाशिक जिल्ह्यात वाढत आहे. युरोपियन युनियन व इतर देशांना आंबा निर्यातीसाठी अपेडाच्या मॅगोनेट प्रणालीव्दारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी केली जाते. निर्यातक्षम आंबा बागांची वेळेत नोंदणी करणे करीता नाशिक जिह्यातील विशेषतः सुरगाणा, कळवण, पेठ, इगतपुरी, नाशिक आणि दिंडोरी मधील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधून विहीत मुदतीत नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी जगदीश पाटील यांनी केले आहे.
सन 2024-25 मध्ये आज अखेर महाराष्ट्र राज्यातून ९४५९ निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी झालेली आहे. निर्यातक्षम आंबा बागाची मॅगोनेट या ऑनलाईन प्रणालीवरनोंदणी करण्याची अंतिम दिनांक ३१ डिसेंबर, 202५ होती. परंतु अपेडानवी दिल्ली कार्यालयाकडे विनंती करून सदर मुदत दि. २८/०२/२०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित कालावधीत विशेष मोहीम राबवून निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी कृषी विभागामार्फत करण्यात यावी. निर्यातक्षम आंबा फळबागेत राबवायच्या योग्य कृषी पद्धती (Good Agriculture Practices) राबविणे आवश्यक आहे. युरोपीय युनियन व अमेरिका देशाला आंबा निर्यात करण्यासाठी क्षेत्रीय शेतकरी स्तरावर ठेवायचे दस्तऐवजचे विहित प्रपत्रात जतन करण्यात यावे. याबाबतच्या सूचना आयुक्तालयाचे दि.६/६/२०२४ व दि. १४/०२/२०२५ रोजीच्या पत्राने देण्यात आल्या आहेत. निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात (प्रपत्र १) अर्ज दाखल करावा. (कागदपत्रे अर्ज, ७/१२, ८ अ आधार कार्ड) त्यानंतर तपासणी अधिकाऱ्यामार्फत (कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, कृषि अधिकारी) क्षेत्राची तपासणी करून प्रपत्र ४ अ मध्ये अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना सादर केला जातो. त्यानंतर २ ब प्रपत्रात नोंदणी प्रमाण पत्र अदा केले जाते. शेतकऱ्यांनी पिक संरक्षणाच्या दृष्टीने शेतात राबविण्यात येणाऱ्या महत्वाच्या बाबींच्या नोंदी प्रपत्र -क मध्ये नोंदी वेळेत घेणे आवश्यक आहे. सर्व आंबा बागायतदारांना विनंती करण्यात येते की सन 2024-25 मध्ये चालू हंगामाकरिता नोंदणी करण्यासाठी संबंधित कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांचेशी संपर्क साधून मॅगोनेटव्दारेनोंदणीसाठी त्वरीत अर्ज करण्यात यावेत. प्रथम नोंदणी व नूतनीकरण करणेसाठी विहीत नमुन्यातील अर्ज, 7/12, 8अ, बागेचा नकाशा व आधार कार्ड इत्यादि कागदपत्राची आवश्यकता आहे. मॅगोनेटव्दारे नोंदणी करण्याची वाढीव व अंतिम मुदत दि. 28 फेब्रुवारी 2025 अशी असल्याचे कळविण्यात आले आहे.
0
2
5
6
2
9