
0
2
5
6
5
9
*वेगवान जीवनासाठी एआय रोबोटीक्स अपरीहार्य
– प्राचार्य डॉ अरूण पाटील*
लासलगाव – जगातील सर्वात हुशार मेंदू म्हणजे नॅचरल इंटेलिजन्स (एनआय) भारतीय स्त्रीयांचा आहे असे सर्वे सांगतात. जगातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) विद्यापीठ भारतात सुरू होत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने एआय शिकणे अपरीहार्य आहे. इच्छाशक्तिच्या जोरावर विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रॉनिक्स व एआय मध्ये स्टार्टअप सुरू करून अर्थार्जन करावे. आर्थिक व्यवहारात टेक्नॉलॉजीचा वापर नैतिकतेने होणे गरजेचे आहे. वेगवान जीवनासाठी एआय रोबोटीक्स अपरीहार्य आहे असे प्रतिपादन महात्मा गांधी विद्या मंदीर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाडचे प्राचार्य डॉ. अरूण पाटील यांनी केले. मविप्र क.क.वाघ महाविदयालयात इलेक्ट्रॉनिक सायन्स विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (आयक्यूएसी) तर्फे आयोजित तीन दिवसीय रोबोट वर्कशॉप व कॉम्पिटीशन अंतर्गत ‘एडव्हान्स इलेक्ट्रॉनिक्स टैक्नॉलॉजी स्कोप अॅंड ऑपर्च्युनिटीज’ या विषयावर प्राध्यापक व विद्यार्थांना मार्गदर्शनपर विशेष व्याख्यान देतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे होते.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), रोबोटीक्स, फाईव्ह जी, वायरलेस कम्युनिकेशन, ब्लॉक चेन, क्लासिकल व क्वांटम कॉम्प्युटींग, फिनटेक, ड्रायव्हरलेस कार, रिनोव्हेबल एनर्जी टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, नॅनोटेक्नॉलॉजी आदी विविध इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी बद्दल माहिती त्यांनी दिली. तसेच इलेक्ट्रॉनिक्स मध्ये करीयर व रोजगार संधीं
बाबत देखील त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सिम्युलेटेड एआयचे प्रात्यक्षित देखील डॉ. अरूण पाटील यांनी दाखविले.
प्रास्ताविकात आयक्यूएसी कोऑर्डीनेटर व इलेक्ट्रॉनिक सायन्स विभागप्रमुख प्रा. भगवान कडलग यांनी कार्यशाळा आयोजनाबाबत भुमिका स्पष्ट केली. प्रा. निलम उफाडे परीचय, प्रा. राणी जगताप सुत्रसंचलन केले. प्रा. किरणकुमार जोहरे यांनी आभार मानले.
कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्रा. भगवान कडलग, प्रा. प्रियांका निकम, प्रा. धनंजय कडलग, प्रा. निलम उफाडे, प्रा. राणी जगताप, प्रा. गायत्री वीर, प्रा. किरणकुमार जोहरे, नामदेव बोराडे, अनिल गवळी, शिवप्रसाद गवळी, ऋतुजा जाधव, निकीता गायकवाड, कामिनी शिंदे, ज्योती आहेर, निशा आहेर, अविनाश कापसे, साक्षी ताकाटे, ऋतुजा जेऊघाले, सेजल पगार, निकीता कुशारे, पंकज गवळी आदींनी परिश्रम घेतले.
0
2
5
6
5
9