विंचूर येथे तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला
विंचूर येथे तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला
चौघांवर गुन्हा दाखल
विंचूर
येथील गणेश चौक येथे पूर्व वैमनस्यातून हाणामारी होऊन एका युवकावर धारदार शस्त्राने वार करून जखमी केल्याची घटना नवरात्र उत्सवात दांडिया खेळतांना घडली. जखमी युवकावर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. जखमी युवकांच्या फिर्यादी वरून चौघांवर लासलगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबद्दल पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार दि.12 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास गणेश चौक येथे नवरात्री निमित्त दांडिया रास सुरु होता. यावेळी मागील भांडणाची कुरापत काढून सचिन चेवले,पप्पू चेवले, राज चेवले, विनायक चेवले आणि सार्थक वाघावकर, श्रावण वाघावकर यांच्यात हाणामारी झाली. यावेळी श्रावण यास मारहाण केल्याचा जाब विचारला असता सचिन चेवले यांनी सार्थक वाघावकर यास बटणाच्या चाकूने वार करून जखमी केले. सार्थक गंभीर जखमी झाल्याने त्यास नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.सार्थक ने दिलेल्या फिर्यादी वरून सचिन चेवले, राज चेवले पप्पू चेवले, विनायक चेवले यांच्या विरुद्ध लासलगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पुढील तपास सपोनि भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप निरीक्षक अप्पासाहेब हंडाळ, पो हवा अरुण डोंगरे, तसेच घुमरे, नीचळ, सागर आरोटे, सांगळे आदी पोलीस करीत आहेत.