0
4
2
9
5
7
विंचूर – दि. 27 पासून गणेशोत्सवास शुभारंभ होत असून दि.६ सप्टेंबर रोजी अनंतचतुर्दशीला गणपती बाप्पाचे विसर्जन होणार आहे. याच दरम्यान दि.५ सप्टेंबर रोजी मुस्लिम बांधवांचा देखील ईद ए मिलाद हा सण आहे. या पार्श्वभूमीवर लासलगाव पोलीस ठाण्याच्या वतीने येथे सशस्त्र पथ संचालन करण्यात आले.

हिंदू व मुस्लिम या दोनही धर्मियांच्या सण उत्सवाच्या काळात काही अप्रिय घटना घडू नये. गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी. समाज कंटकांना जरब बसावी. तसेच सामान्य नागरिकांना निर्भयतेने उत्सवाचा आनंद घेता यावा. या उद्देशाने लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली विंचूरच्या मुख्य रस्त्याने सशस्त्र पोलीस दलाचे पथ संचालन करण्यात आले.
प्रारंभी विंचूर पोलीस चौकीत पोलीस दलाची परेड घेण्यात आली. तद्नंतर गावातून पथ संचालन करण्यात आले. यावेळी लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भास्कर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंखे,पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील,पो हवा. ज्ञानेश्वर जाधव,पो.कॉं.सागर आरोटे,पो.कॉं.अविनाश सांगळे, शशिकांत निकम,शरद बागल, किशोर लासूरकर, महिला कर्मचारी उषा आहेर आदींसह लासलगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी व होमगार्ड पथकातील कर्मचाऱ्यांसह सुमारे ४० कर्मचारी पथ संचलनात सहभागी झाले होते.
0
4
2
9
5
7



