1 लाख रु. जिंकण्याच्या आशेपासून ते 50-लाख रु. च्या प्रश्नाचा सामना करेपर्यंतचा मिंटू सरकारचा विजयाचा प्रवास बघा KBC 16 मध्ये!

या आठवड्यात सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती 16 मध्ये होस्ट अमिताभ बच्चन यांच्या समोर हॉटसीटवर दिसणार आहे पश्चिम बंगालच्या रायगनीहून आलेला विनम्र आणि कष्टाळू स्वभावाचा मिंटू सरकार. मिंटूचे जीवन हा चिकाटीचा प्रवास आहे. चिकाटी आणि आशा या प्रवासाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. किराणा मालाचे आणि चहाचे छोटेसे दुकान चालवणाऱ्या मिंटूने आयुष्यात अनेक वादळे पचवली आहेत. गेल्या वर्षात त्याने सोसलेले कष्ट ऐकताना ही कहाणी अधिकच हृदयस्पर्शी होते.
जानेवारी 2024 मध्ये मिंटूच्या वडीलांचे निधन झाले. त्यांना आरोग्यविषयक अनेक समस्या होत्या. त्यांच्या आजारपणात वैद्यकीय खर्चासाठी त्यांना आपली वडीलोपार्जित जमीन गहाण ठेवावी लागली होती. मिंटू आणि त्याच्या कुटुंबासाठी या जमिनीच्या तुकड्याचे मोठे भावनिक मूल्य आहे, कारण त्याच्या वडिलांचा तो शेवटचा वारसा आहे. त्यामुळे KBC मध्ये येण्यामागे त्याचा छोटासा, एकमेव उद्देश आहे. आपल्या वडीलांची गहाण ठेवलेली जमीन सोडवून आपल्या कुटुंबाच्या वारशाचे जतन करणे. अशाप्रकारे, गहाण जमीन सोडवण्यासाठी 1 लाख रु. जिंकण्याच्या अपेक्षेने KBC मध्ये आलेल्या मिंटूची जिद्द आणि हुशारी त्याला 50 लाख रु. च्या प्रश्नापर्यंत घेऊन गेली. शुक्रवारच्या भागात मिंटू 50 लाख रु. च्या प्रश्नाचा सामना करताना दिसेल.
होस्ट श्री. अमिताभ बच्चन यांच्याशी गप्पा मारताना भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणाऱ्या विजया लक्ष्मी पंडित या महिला राजदूताचा एक प्रेरणादायक किस्सा श्री. बच्चन यांनी सांगितला. ते म्हणाले, “त्यावेळी, विजया लक्ष्मी पंडित वयाने खूप लहान होत्या. त्या एका झाडाखाली खेळत असताना तिकडे एक साप आला. जरा वेळ साप तिथेच थांबला आणि मग आपल्या वाटेने निघून गेला. सगळ्यांनी सांगितले की, हा एक शुभशकुन आहे, तुला मिळालेला आशीर्वाद आहे.” गोष्टीचा सारांश सांगताना बिग बी म्हणाले, की “जीवनातल्या काही अगदी असामान्य घटनांकडे देखील वरदान म्हणून बघता येते.”
KBC च्या हॉटसीटवर मिंटूची उपस्थिती खरोखर प्रेरणादायक आहे. केवळ त्याच्या खडतर जीवन-प्रवासामुळे नाही, तर त्याच्या हुशारीमुळे, चिकाटीमुळे आणि अनेक प्रतिकूलता असूनही त्याला मार्गदर्शन करत राहणाऱ्या त्याच्या स्वप्नांमुळे!
बघा, असे अनेक प्रेरणादायक किस्से ‘कौन बनेगा करोडपती 16’ मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!