
0
3
2
1
2
3
नांदगाव शिवसेनेच्या वतीने राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांचा सत्कार
नांदगाव, दि.3 (मुक्ताराम बागुल):- नांदगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या आदेशाने राज्यमंत्री (महाराष्ट्र राज्य) माधुरी मिसाळ यांचा नांदगाव येथील शासकीय विश्रामगृह शिवनेरी येथे सत्कार करण्यात आला. माधुरी मिसाळ या नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी जवळ असलेल्या श्री क्षेत्र नस्तनपुर येथे शनी देवाच्या दर्शनासाठी आल्या होत्या. शिवसैनिक शिवसेना पदाधिकारी व शिवसेना नेते यांच्या उपस्थितीत पुष्पहार देत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी राजाभाऊ देशमुख, नांदगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष अरुण पाटील, चेतन पाटील, सागर हिरे, राजाभाऊ देशमुख, सुनील जाधव, रमेश काकळीज, प्रकाश शिंदे, सतीश बोरसे, भैय्यासाहेब पगार, जेवण गरुड, देशमुख सर, संतोष सोर, भरत पारक आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
3
2
1
2
3