Breaking
ई-पेपरसामाजिक

लासलगावात महायुती आणि भुजबळ समर्थकांचा जल्लोष

0 3 2 1 2 3

*लासलगावात महायुती आणि भुजबळ समर्थकांचा जल्लोष*

*लासलगाव येथे ढोल-ताशाच्या गजरात गुलाल उधळला*….

 शरद लोहकरे, लासलगाव 

*लासलगाव येथे भुजबळ समर्थकांनी जल्लोष केला. गणेश नगर गणेश मंदिर येथून ढोल-ताशांच्या गजरात फटाके फोडून तसेच पेढे वाटप करून सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला..आणि एकमेकांचे अभिनंदन केले..*

 *मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मंत्री छगन भुजबळ यांना 26,400 मतांनी विजयी घोषित करताच लासलगाव शहरातील राष्ट्रवादी व भाजप शिवसेनेसह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात जल्‍लोष केला. आमदार भुजबळ यांनी पाचव्यांदा विजयश्री खेचून आणली असून, फटाके वाजवत एकमेकांना मिठाई वाटून आनंद व्यक्‍त केला. या वेळी माजी आमदार कल्याणराव पाटील,मा जी प सदस्य डी.के जगताप ,सौ सुवर्णा जगताप राजेंद्र चाफेकर,शेखर होळकर,रामनाथ शेजवळ,वाल्मीकराव गायकवाड ,दत्तुलाल शर्मा,राजू राणा,बालेश जाधव,बबन शिंदे,सोमनाथ गांगुर्डे,वसीम तांबोळी,तुकाराम गांगुर्डे,बापू लचके,कैलास केदारे,अनिल सोनवने,सतीश पवार,सुशील भोसले,भोलकाका पवार,राजू जाधव,मनीष चोपडा,लखन खलसे,अयाज शेख,शितल शिंदे,ज्योती शिंदे,रूपा केदारे,उषा कुमावत,रंजना शिंदे,शैलजा भावसार,सोनाली शिंदे,भारती महाले,योगिता आंबेकर,पूजा भावसार,सिंधू पल्हार,आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महायुतीची लाडकी बहीण योजना मुळे या परिसरातील महिलांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला..त्यामुळे महिलांचा प्रचंड पाठिंबा मिळाला..या विजयामुळे आता लासलगाव येवला मतदारसंघातील लासलगाव सह परिसरातील ४६ गावातील विकास कामाला वेग येणार आहे असे सुवर्णा जगताप यांनी नमूद केले..

सकाळपासूनच कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीच्या निकालाबाबत उत्सुकता होती. भुजबळांचा विजयी झाल्‍याचे समजताच शहरासह ग्रामीण भागात कार्यकर्त्यांनी आतषबाजी करून आनंद व्यक्त केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे