Breaking
ई-पेपरकृषीवार्तादेश-विदेशसत्कारसंपादकीयसामाजिक

त्या मुलीचा पाय अलगद टिकावाला लावला जातो आणि….

राजस्थानमधील एका गावात राबवला जातो ...हा उपक्रम

0 3 2 1 2 3

भाऊसाहेब हुजबंद …

राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यात पिपलांत्री या गावात मुलगी जन्माला आल्यावर तिच्या नावे लेकीचं स्वागत म्हणून एक झाड लावलं जातं. याबाबत अधिक माहिती अशी कि, राजस्थानमधील पिपलांत्री या गावाचा एक छोटा व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला त्यात एक मल्याळी डॉक्टर- जी स्वतः गर्भवती आहे बसमध्ये प्रवासात असताना तिला तिच्या दवाखान्यातून फोन येतो. इमर्जन्सी पेशंट असल्याचं ऐकून लेबर रूम तयार करायच्या सूचनादेखील ती देते. धावत पळत जाऊन ती त्या गर्भवती बाईला मोकळं करते आणि केबिनमध्ये जाऊन स्वतः मोकळा श्वास घेणार तेवढ्या बाहेर काही तरी गोंधळ चालू असल्याचा आवाज तिच्या कानी पडतो. ती रस्ता काढत कशीबशी पुढे जाते तर जन्मलेल्या बाळाला एक टिकावधारी माणसाकडे नेलं जात असल्याचं तिला दिसतं. त्या ठिकाणी अनेक स्त्रियासुद्धा उपस्थित असतात. जशी ती व्यक्ती समोर यायला लागते तसे सर्वजण त्याला वाकून नमस्कारसुद्धा करतात. आता व्हिडिओ पुढे पाहावा की नको या संभ्रमात असेपर्यंत समोर दिसतं- त्या मुलीचा पाय अलगद टिकावाला लावला जातो आणि वृक्षारोपणाची तयारी पूर्ण होते. लेक आणि निसर्ग वाचवण्याचं या गावाचं हे अनोखं मॉडेल या व्हिडिओमुळे माहीत झालं. हे गाव राजसमंद जिल्ह्यात आहे. महाराणा प्रताप यांचा जन्म याच जिल्ह्यात कुंभालगड किल्ल्यात झाला. इतिहासातील हल्दी घाटीची लढाई याच जिल्ह्यातली. संगमरवरासाठी हा जिल्हा प्रसिद्ध आहे. गावातसुध्दा संगमरवरी खाणी असल्याने आणि भौगोलिक कारणांमुळे पाण्याची पातळी अगदीच खालावलेली. २००५ मध्ये श्याम सुंदर पालीवाल सरपंच झाले. तेव्हा यांनी या प्रकल्पाची सुरुवात केली. औद्योगिकरण आणि नैसर्गिक रचना यांमुळे जवळपास कुठलीही हिरवळ आणि वनसंपदा नसलेला हा भाग. जमिन नापिक आणि गाव ओसाड अशी सगळी परिस्थिती. स्वतःच्या मुलीच्या स्मृतीत पालीवाल यांनी झाड लावलं त्यातून हा वेगळा उपक्रम सुरू झाला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे