विंचूर ता.१६
माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात मंत्री म्हणून स्थान न दिल्याने आज सकाळी साडेदहा वाजता विंचूर येथे तीन पाटीवर अर्धा तास नाशिक संभाजी महामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार पक्ष) व येवला-लासलगाव मतदारसंघातील ४६ गावातील भुजबळ समर्थकांनी रास्ता रोको केला. यावेळी ”भुजबळ साहेब आगे बडो…” अशा घोषणा देत भुजबळ समर्थकांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली.
यावेळी सरपंच सचिन दरेकर, विलास गोरे, डॉ.श्रीकांत आवारे, धनंजय जोशी, सोहेल मोमीन, दत्तु डुकरे, अशोक नागरे, भाऊसाहेब भवर, पांडुरंग राउत, जयंत साळी, शिवाजी सुपनर ,संजय घायाळ, मधुकर गायकर, शांताराम नागरे, मंगेश गवळी, इस्माईल मोमीन, महेंद्र पुंड, किशोर जेऊघाले, प्रकाश काकड, सुरेखा नागरे, डॉ वैशाली पवार, शंकरलाल सोनी, गोविंद हीरे, चंदु लांडबले, सुनिल नेवगे, बालीश जाधव, ज्ञानेश्वर पवार, तुळशीराम पुंड, अमजद पठाण, नइम पठाण, संतोष राऊत, संदिप राऊत, दत्तु रायते, संतोष राजोळे, संदिप काकड, राजेंद्र पारीख, माधव जगताप, वाल्मिक सोदक आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.