Breaking
क्रिडा व मनोरंजन

आर टी बी फिल्म्स प्रस्तुत ‘जनक’ चा ट्रेलर प्रदर्शित!

0 5 2 1 6 4

न्यायाच्या चौकटीत सत्याची कसोटी! आता रंगणार संघर्षाची निर्णायक लढाई! अभिषेक कंवर दिग्दर्शित, आर टी बी फिल्म्स प्रस्तुत ‘जनक’ चा ट्रेलर प्रदर्शित!

आरोप म्हणजेच सत्य, की या आरोपांच्या पलीकडे दडलंय काही वेगळंच वास्तव? एका बापाच्या सन्मानासाठी न्यायालयात उतरलेली लेक आणि सत्याचा शोध घेणारा हा संघर्ष प्रत्येक टप्प्यावर नवं गूढ निर्माण करतो. भावनांचा कल्लोळ, कोर्टरूममधील शाब्दिक युद्ध आणि प्रत्येक वळणावर गडद होणारं रहस्य अशा थरारक विश्वाची झलक घेऊन अभिषेक कंवर दिग्दर्शित, आर टी बी फिल्म्स प्रस्तुत ‘जनक’चा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सत्यघटनेवर आधारित या चित्रपटाचा ट्रेलर प्रत्येक क्षणी नवं कोडं उभं करतो आणि पुढे नेमकं काय घडणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचवतो.

‘जनक’ सिनेमाचा ट्रेलर एका बापावरील आरोप आणि त्याच्या सन्मानासाठी लढणाऱ्या लेकीचा भावनिक संघर्ष मांडतो. न्यायालयीन प्रक्रियेतील गुंतागुंत, सत्यापर्यंत पोहोचण्याची धडपड आणि प्रत्येक टप्प्यावर समोर येणारे नवे पैलू कथेला अधिक परिणामकारक बनवतात.

कोर्टरूममधील तणावपूर्ण वातावरण, कलाकारांचा प्रभावी अभिनय यांमुळे ट्रेलरची पकड सुरुवातीपासून शेवटपर्यंत कायम राहते. आरोपांमागचं वास्तव काय? बापावर झालेले आरोप खरे आहेत की त्यामागे दडलेलं सत्य काही वेगळंच आहे? आपल्या वडिलांचा सन्मान जपण्यासाठी लढणाऱ्या लेकीच्या प्रयत्नांना यश मिळणार का? असे अनेक प्रश्न ट्रेलर पाहताना मनात निर्माण होतात.

वडिलांच्या सन्मानासाठी न्यायालयात संघर्ष करणाऱ्या लेकीची भूमिका अभिनेत्री सायली संजीवने ताकदीने साकारली आहे. तिच्या व्यक्तिरेखेतील भावनिक चढ-उतार, अविनाश नारकर यांचा प्रभावी अभिनय आणि सुरेश विश्वकर्मा यांच्यासोबतचे नाट्यमय प्रसंग ट्रेलरमध्ये विशेष लक्षवेधी ठरतात.

अभिषेक कंवर यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद ओंकार भसमे यांचे असून, त्रिलोक सिंग राजपूत यांनी असोसिएट प्रोड्युसर, तर सुजीत मुकाटे यांनी कार्यकारी निर्माते म्हणून योगदान दिले आहे. चित्रपटाला आदित्य कडताने यांचे संगीत लाभले आहे.
बापाच्या सन्मानाची शपथ, लेकीच्या जिद्दीची साथ. सत्याच्या लढाईत कोणाची होणार मात? आरोपांच्या पलीकडे दडलेलं गूढ उलगडणार कसं? या सगळ्या प्रश्नांचा पडदा उघडणार १३ नोव्हेंबर २०२६ रोजी, मोठ्या पडद्यावर!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 2 1 6 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे