
0
3
3
0
5
1
सागर निकाळे-निफाङ प्रतिनिधी-
मराठी भाषेवर वाढत्या हिंदी सक्तीविरोधात निफाड शहरात जोरदार आंदोलन करण्यात आले. माजी आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षांचे मराठीप्रेमी कार्यकर्ते एकत्र येत शासकीय आदेशाची (जीआर) होळी करून महाराष्ट्र सरकारचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
या आंदोलनात ज्येष्ठ नेते भास्करनाना बनकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख नितीनदादा आहेर, दिगंबरनाना गीते, वैशालीताई कदम, विक्रमदादा रंधवे, खंडू बोडके पाटील यांच्यासह इतर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी भाग घेतला.”मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही”, “हिंदी सक्ती हटवा”, “मराठीला न्याय द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनादरम्यान शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), मनसे या पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठी भाषेवरील प्रेम आणि अस्मितेच्या भावनेने प्रेरित होऊन अनेक मराठीप्रेमी नागरिकांनीही आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.आंदोलनकर्त्यांनी शासकीय जीआरची होळी करत महाराष्ट्र सरकारचा निषेध केला आणि निफाड पोलीस स्टेशनमध्ये निवेदनही सादर केले.
या वेळी अनिल कदम म्हणाले, “महाराष्ट्रात मराठी ही अभिमानाची भाषा असून तिच्यावर अन्य भाषांची सक्ती खपवून घेतली जाणार नाही. सरकारने त्वरित ही हिंदी सक्ती मागे घ्यावी अन्यथा यापुढे अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल.”संपूर्ण आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने पार पडलं असून, निफाड शहरात मराठी अस्मितेचा बुलंद नारा आज ऐकू आला.
0
3
3
0
5
1