परेश गणात्रा ‘आपका अपना झाकिर’ या शो च्या संचात दाखल!
- सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन
परेश गणात्रा सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘आपका अपना झाकिर’ या हलक्या-फुलक्या शो च्या संचात दाखल!
भारतीय विनोदाच्या क्षेत्रात आघाडीचे नाव असलेला, अष्टपैलू झाकिर खान सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘आपका अपना झाकिर’ या शो मध्ये होस्टच्या रूपात टेलिव्हिजनवर पदार्पण करत आहे. झाकिरची विनोदबुद्धी आणि जीवनातले किस्से यांचे मिश्रण करणारा हा सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील हा हलका-फुलका शो म्हणजे ‘आनंदाची गॅरंटी’ आणि ‘मनोरंजनाची हमी’ आहे. या शो मध्ये शायरी, सेलिब्रिटीजच्या मुलाखती आणि हास्याची कारंजी असतील! या शो मध्ये झाकीर सोबत श्वेता तिवारी आणि ऋत्विक धनजानी तर आहेतच, पण आता उत्कृष्ट विनोद-बुद्धी असलेला प्रख्यात अभिनेता परेश गणात्रा देखील या संचात दाखल झाला आहे. ‘सख्त लौंडा’च्या सोबत हे सगळे कलाकार प्रेक्षकांना एक अनोखा आणि रंजक अनुभव देतील, जो प्रेक्षकांसाठी नक्कीच सुखावह असेल!
परेश गणात्रा ‘आपका अपना झाकिर’ मध्ये आपला खास रंग भरण्यास सज्ज आहे. तो या शो मध्ये एक अशी व्यक्तिरेखा उभी करणार आहे, ज्याचे मन केवळ दोनच विषयांत रमलेले असते- पैसा आणि खाणे! हे खास गुजराती व्यक्तिमत्व शेअर्स, रियल इस्टेट, इन्शुरन्स आणि गुंतवणूक या विषयांवर बोलताना दिसेल. परेश गणात्रा म्हणतो, “‘आपका अपना झाकिर’ मध्ये सहभागी होताना मला खूप आनंद होत आहे. कॉमेडी काळानुरूप खूप बदलली आहे आणि विविधरंगी मनोरंजन देणाऱ्या या परिपूर्ण शो मध्ये सामील होताना माझ्यात उत्साह संचारला आहे. पैसे कसे कमवावे आणि छान छान खाद्यपदार्थांचा आस्वाद कसा घ्यावा याच गोष्टींचा सतत विचार करणारे पात्र उभे करताना खूप मजा येत आहे. या शो मध्ये मी माझा विनोदी स्पर्श देऊ शकेन अशी अशा आहे. झाकिरची विनोद सादर करण्याची अप्रतिम शैली आणि पडद्यावर आणि पडद्याच्या मागे उभी असलेली अप्रतिम टीम यामुळे आम्ही प्रेक्षकांना एक आगळा-वेगळा विनोदी अनुभव नक्की देऊ शकू. 10 ऑगस्ट पासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे!”
‘आपका अपना झाकिर’ सुरू होत आहे 10 ऑगस्ट रोजी आणि दर शनिवारी आणि रविवारी रात्री 9:30 वाजता तो प्रसारित करण्यात येईल, फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरून!