
0
2
5
5
5
9
सौ. सोनियाताई होळकर चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे कर्तुत्ववान महिलांचा गुणगौरव सोहळा संपन्न
लासलगाव येथे जागतिक महिला दिनानिमित्त सोनियाताई होळकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने समाजातील विशेष नाविन्यपूर्ण व उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार वितरण सोहळा समारंभ वेफको ऑफिस लासलगाव येथे संपन्न झाला.यावेळी सरपंच योगिता पाटील ,पुष्पाताई दरेकर ,स्वाती बुब ,अमिता ब्रम्हेचा ,डॉ .उषा बंद छोडे, संगीता सुरसे मॅडम, आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणातून स्त्री-पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करते. त्यांनी आपली स्वतःची ओळख आणि योग्यता सिद्ध करून दाखवली अशा तळागाळातील व सर्व घरातील महिलांचा सन्मान होणे महत्त्वाचे आहे त्यातूनच इतर महिलांना देखील प्रेरणा मिळते. असे मनोगत सोनियाताई होळकर यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व सत्कारपूर्ती महिलांचा परिचय आणि त्यांनी केलेली उत्कृष्ट कामाची माहिती श्रीम. नलिनीताई शिंदे पाटील मॅडम यांनी दिली कार्यक्रम प्रसंगी अमिता ब्रम्हेचा, प्रतीक्षा दायमा, दिपाली उपाध्ये, अनिता पवार, चंद्रकला गांगुर्डे, भाग्यश्री सोनवणे, वर्षा दायमा, पुष्पाताई दरेकर, स्मिता कुलकर्णी, स्वाती बुब, शेवटी अध्यक्ष सरपंच योगिता पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले
महिला दिनानिमित्त सत्कारमूर्तींचे नावे – सौ. उषा पवार, सुनीता वर्मा,सीमा दरेकर,ज्योती वाघचौरे, प्रमिला सपकाळे, दुर्गा गुंजाळ ,अर्चना सोनवणे, वाकचौरे ताई, विमल कदम, पल्लवी दाभाडे, अश्विनी जाधव, काद्री सिस्टर, डॉ श्रीदेवी चांडक, योगिता माळी,नंदा वाघ, सिंधुताई पाल्हाळ, सीमा पाटील, चंद्रकला गांगुर्डे,प्राजक्ता भंडारी, संगीता गरुड, जनाबाई विस्ते, भारती कुमावत, विमलबाई शेजवळ, संगीता शेजवळ, अशा एकूण ३५ महिलांचा सत्कार करण्यात आला.
0
2
5
5
5
9