Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगसामाजिक

मित्राने केला मैत्रिणीचा खून, नाशिक तालुक्यातील सारूळ येथे आढळला मृतदेह

0 4 2 9 5 7

नाशिक तालुक्यातील सारूळ शिवारात गट नंबर 25 मधील मोकळ्या गवताळ जागेत एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने वाडीवऱ्हे पोलिसांनी घटनास्थळीत जाऊन पंचनामा केला त्यानंतर मयत तरुणीचा शोध सुरू केला. पोलीस तपास सुरू असताना अकोला सिव्हिल लाईन येथे पोलीस स्टेशनमध्ये तरुणी बेपत्ता असल्याची नोंद आढळून आली. त्यावरून मयत मुलीच्या आई-वडिलांना संपर्क केला असता फोटो वरून मयत तरुणीची ओळख पटली. ही मुलगी अकोला येथे अकरावीत शिकत होती. तिचे बुलढाणा जिल्ह्यातीलच एका तरुणाचे मैत्रिचे संबंध होते. हा तरुण नाशिकच्या संदीप फाऊंडेशन मध्ये fy ला शिक्षण घेत आहे. अथर्व देशमुख असे या तरुणाचे नाव आहे.

मयत तरुणीच्या आई-वडिलांनी सदर तरुणाबाबत संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी त्याला संशयितरित्या फिरत असताना ताब्यात घेतले. नाशिकच्या सातपूर परिसरात तो सध्या राहत आहे.

दोघेही बुलढाणा जिल्ह्यातील असून दोघांच्याही परिवाराचे चांगले संबंध असल्याचे सांगण्यात येते. अथर्व यास त्या तरुणीचा इतर कोणाबरोबर संबंध असल्याचा संशय आल्याने रागाच्या भरात बुलढाण्याहून नाशिकला येत असताना तरुणीचा गाडीतच खून करून नाशिक तालुक्यातील सारूळ येथे मृतदेह टाकून देण्यात आला. अशी काबुली तरुणाने वाडीवरे पोलिसांना दिली. या तरुणा बरोबर आणखी काही जन सहभागी असल्याचे पोलिसांनी माहिती देताना सांगितले. या घटनेबाबत वाडीवरे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तपास करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे