Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजनसामाजिक

गुरुदास मान आणि शंकर महादेवन यांनी सांगितल्या बच्चन परिवारासोबत हृदयस्पर्शी आठवणी

0 1 5 7 0 3

गुरुदास मान आणि शंकर महादेवन यांनी कौन बनेगा करोडपती 16 मध्ये बच्चन परिवारासोबत हृदयस्पर्शी आठवणी सांगितल्या.. 

सोनी एंटरटेनमेंट टेलीव्हिजनवरील बहुचर्चित गेम शो कौन बनेगा करोडपती-16 मध्ये यंदाच्या मंगळवारी एक शानदार सेलिब्रेशन असेल. प्रसिद्ध गायक गुरुदास मान आणि शंकर महादेवन हे त्यांची उच्च प्रतीची प्रतिभा आणि प्रचंड स्फूर्तीने मंचावर येतील. पंजाबी लोकगीतांवर गुरुदास मान यांच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमाचे होस्ट अमिताभ बच्चन हेदेखील हास्यमय आणि मनमोहक गायकीत सहभागी होतील. त्यामुळे सेलिब्रेशनमध्ये आणखीच उत्साह येईल. त्यांचे हलके-फुलके किस्से आणि मजेशीर विनोद यामुळे या सायंकाळी हास्य, प्रेरणा आणि निखळ मनोरंजन यांचा अविस्मरणीय मिलाप पहायला मिळेल. 

अमिताभ बच्चन यांनी खास आठवणी सांगताना, त्यांची मुलगी श्वेता हिच्या लग्नात गुरुदास मान यांनी अत्यंत भावपूर्ण सादरीकरण केल्याचे सांगितले. तसेच या प्रसिद्ध गायकाने दिलेली एक भावपूर्ण नोट, जी त्यांनी आजही जपून ठेवली आहे, त्याबद्दल सांगितले. शंकर महादेवनसुद्धा बच्चन कुटुंबियांशी असलेल्या नात्याविषयी सांगतील. अभिषेक बच्चनच्या लग्नात सन्मानपूर्वक केलेल्या सादरीकरणाबद्दल ते सांगतील.

अमिताभ बच्चन पंजाबी गाण्यांकडे असलेला त्यांचा ओढा याबद्दल सांगताना म्हणतात, “मी माझी मुलगी श्वेता हिच्याशी बोलत होतो. आमच्या कुटुंबात सगळीच मुले पंजाबी लोकगीतं ऐकतात. आमच्याकडे ही गाणी खूप आवडतात. मी विचारलं, ही गाणी एवढी लोकप्रिय का होतात आणि हे गायक कुठून येतात? खूप नवे गायक येत आहेत, ते खूप छान गातात. तर तिने मला जे सांगितले, त्याबद्दल तुम्ही मत सांगावे- मग ते खरं असो वा खोटं.. ती म्हणाली, खूप लहान वयात मुलं गुरुद्वारात जातात, बानी ऐकतात आणि तिथूनच शिकतात. तिथूनच त्यांना संगीताचे ज्ञान मिळते. हे खरे आहे का?”

गुरुदास मान उत्तर देतात, “होय, हे अगदी बरोबर आहे सर. ” ते पुढे म्हणतात, “मला आज खूप प्रेम आणि आदर मिळाल्यासारखे वाटत आहे. मला आठवते, श्वेताच्या लग्नासाठी मी दिल्लीत आलो होतो. आमच्या ग्रुपने तेथे सादरीकरण केले होते. शहंशाह (बच्चन यांचा उल्लेख करत.)आमच्यासमोर उभे होते. माझ्या सादरीकरणानंतर त्यांनी मला आशीर्वादाच्या रुपात 500 ची नोट दिली होती. ती नोट आजही मी एखादा खजिना असावा, त्याप्रमाणे माझ्याजवळ जपून ठेवली आहे.  ”

शंकर म्हणाले, “तुम्ही श्वेताजींच्या लग्नात गायन केले होते आणि मी अभिषेकच्या लग्नात.. ”  अमिताभ बच्चन एका नव्या वर्षाच्या हाऊस पार्टीविषयी सांगतात, तेव्हा ही सायंकाळ आणखी मजेदार ठरेल. या पार्टीत पंडित बिरजू महाराज आणि जाकिर हुसैन या दिग्गजांनी आपल्या कलेची जादू दाखवली. ती पार्टी संपूर्ण रात्र चालली. तो एक संगीतमय उत्सव बनला, सकाळी 5 वाजेपर्यंत चालला. 

कार्यक्रमाची ही रम्य सायंकाळ पाहण्यासाठी ट्यून इन करा. कारण दिग्गज शंकर महादेवन आणि गुरुदास मान अमिताभ बच्चन यांच्यासोबत करिअर आणि वैयक्तिक अनुभवांच्या अविस्मरणीय कहाण्या-किस्से सांगणार आहेत. कौन बनेगा करोडपती 16 चा हा विशेष भाग या मंगळवारी रात्री 9 वाजता, फक्त सोनी एंटरटेनमेंट टेलीव्हिजनवर पहायला विसरू नका..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 5 7 0 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे