Breaking
ब्रेकिंग

“अपमान एका क्षणाचा… पण स्वाभिमानाची लढाई आयुष्यभराची!” अभिषेक कंवर दिग्दर्शित, आर टी बी फिल्म्स प्रस्तुत ‘जनक’ सिनेमाचा मोशन पोस्टर आऊट !

0 5 1 7 3 0

तो एक क्षण… ती एक घटना… आणि आयुष्यभरासाठी बदललेलं सत्य! अभिषेक कंवर दिग्दर्शित, आर. टी. बी. फिल्म्स प्रस्तुत ‘जनक’ चित्रपटाचा दमदार मोशन पोस्टर प्रदर्शित !

स्वाभिमान, सत्य आणि न्यायाची लढाई ! कोर्टरूम ड्रामाचा अनोखा मेळ साधणाऱ्या ‘जनक’ या आगामी मराठी चित्रपटाचा मोशन पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. दिग्दर्शक अभिषेक कंवर यांच्या या चित्रपटाच्या मोशन पोस्टरमधून रहस्य, संघर्ष आणि न्यायाच्या लढाईची झलक पाहायला मिळते. काही सेकंदांच्या या मोशन पोस्टरमधूनच चित्रपटातील संघर्षाची तीव्रता आणि पुढे उलगडणाऱ्या रहस्याची उत्सुकता निर्माण होते.

आयुष्य बदलणाऱ्या त्या एका घटनेनंतर सुरू झाली अशी लढाई जिथे पणाला लागला आहे एका माणसाचा स्वाभिमान आणि त्याच एका घटनेने उभा केला न्यायाचा प्रश्न ! आर. टी. बी. फिल्म्स निर्मित आणि अभिषेक कंवर दिग्दर्शित या कोर्टरूम ड्रामा मध्ये अविनाश नारकर, सायली संजीव आणि सुरेश विश्वकर्मा हे प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. त्याचबरोबर विनिता काळे, अनुष्का पिंपुटकर, ओंकार भसमे, प्रसाद ओझरकर यांच्यासह अनेक नामवंत मराठी कलाकार सिनेमात दिसणार आहेत.

चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कंवर यांनी केले असून, कथा, पटकथा आणि संवादलेखन ओंकार भसमे यांचे आहे. त्रिलोक सिंग राजपूत असोसिएट प्रोड्युसर, सुजीत मुकाटे कार्यकारी निर्माते असून आदित्य कडताने यांनी संगीताची जबाबदारी सांभाळली आहे.

एक स्त्री… एक सत्य… आणि एक लढा या तीन सूत्रांभोवती गुंफलेली ही कथा नेमकं सत्य काय आहे आणि न्यायाच्या या लढाईत कोण जिंकणार ? याची उत्सुकता निर्माण करते.

अभिषेक कंवर दिग्दर्शित आणि आर टी बी फिल्म्स प्रस्तुत जनक हा थ्रिलर कोर्टरूम ड्रामा नोव्हेंबर २०२६ मध्ये महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 7 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे