Breaking
सत्कार

विंचूरचे सुप्रसिद्ध संगीतकार-कवी प्रदीप देविदास काशीकर यांना राज्यस्तरीय ‘काव्यरत्न पुरस्कार’

0 4 2 9 5 7

विंचूर प्रतिनिधी

विंचूर येथील सुप्रसिद्ध संगीतकार, कवी आणि साहित्यप्रेमी प्रदीप देविदास काशीकर यांना त्यांच्या साहित्य व संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्यस्तरीय ‘काव्यरत्न पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले कुसुमाग्रज प्रतिष्ठान विशाखा सभागृहात हा सोहळा पार पडला. या पुरस्कारामुळे विंचूर परिसरासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित भव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते.
प्रदीप काशीकर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून कविता, गीते, भक्तिगीते, सामाजिक प्रबोधनपर रचना तसेच संगीत दिग्दर्शनाच्या माध्यमातून साहित्य व कला क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कविता समाजातील वास्तव, माणुसकी, निसर्गप्रेम, अध्यात्म आणि सामाजिक जाणीव यांचे प्रभावी दर्शन घडवतात. त्यांच्या अनेक रचनांना रसिकांची विशेष पसंती लाभली असून विविध सांस्कृतिक कार्यक्रम, काव्यसंमेलनांत त्या सादर केल्या जातात.
पुरस्कार स्वीकारताना प्रदीप काशीकर यांनी “हा सन्मान माझ्या गुरुजनांना, कुटुंबीयांना आणि माझ्या लिखाणावर प्रेम करणाऱ्या रसिकांना समर्पित करतो. पुढील काळात नव्या पिढीसाठी प्रेरणादायी साहित्यनिर्मिती करण्याचा प्रयत्न राहील,” असे मनोगत व्यक्त केले.
या यशाबद्दल विंचूर ग्रामस्थ, साहित्यप्रेमी, कलाकार, मित्रपरिवार तसेच विविध सामाजिक व सांस्कृतिक संस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या सन्मानामुळे विंचूरच्या साहित्यिक परंपरेचा गौरव वाढल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे

4.5/5 - (2 votes)

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे