मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024;
अंतिम मतदार यादी 30 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार : जिल्हाधिकारी जलज शर्मा
नाशिक (जि. मा. का. वृत्तसेवा) : विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार 1 जुलै 2024 या आर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा सुधारित विशेष पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) जाहिर झाला असून 30 ऑगस्ट 2024 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्धी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारुप मतदार यादी आज प्रसिध्दी करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने मतदारांना दावे व हरकती 20 ऑगस्टपर्यंत दाखल करता येणार असून शनिवार व रविवार तसेच दावे व हरकत कालावधीत 10, 11, 17 व 18 ऑगस्ट, 2024 या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या परवानगीने दावे व हरकतींवर निर्णय घेवून मतदार यादीची गुणवत्ता तपासणी करुन 29 ऑगस्ट 2024 रोजी अंतिम यादी प्रसिध्दी करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील मतदारांनी आपले नाव यादीत आहे किंवा कसे याबाबत ऑनलाईन ॲपद्वारे खात्री करावी. तसेच 1 ऑक्टोंबर, 2024 रोजी 18 वर्ष पुर्ण केलेल्या परंतू अद्यापही आपले नाव मतदार यादीत न नोंदविलेल्या नवमतदारांनी Voter Service Portal, Voter Helpling App या ऑनलाईन ॲपद्वारे किंवा आपल्या भागातील बीएलओ यांच्यामार्फत 20 ऑगस्ट अखेर फॉर्म नं. 6 भरुन जमा करावा व आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 मध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.
00000000