Breaking
गुन्हेगारी

लासलगाव पोलीसांनी आवळल्या पुण्याच्या दोन युवकांच्या मुसक्या

3 गावठी कट्टे, 9 जिवंत काडतुसे, मोटारसायकलसह दिड लाखाचा मुद्देमाल जप्त

0 3 2 1 2 3

विंचूर/प्रतिनिधी-:

लासलगांव पोलीसांनी रात्रगस्त पेट्रोलिंग व नाकाबंदी दरम्यान दोन आरोपींचा सिनेस्टाईल पाठलाग करुन तीन गावठी कट्टे, 09 जिवंत काडतुसांसह 01 विना क्रमांकाची शाईन मोटारसायकल सह एकुण 1,44,000 किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपींना शिताफिने जेरंबद केले. 

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर, व निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे यांनी केलेल्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे लासलगाव पोलीस ठाणे हद्दीत विभागीय गस्त दरम्यान सहा. पोलीस निरीक्षक भास्कर जे शिंदे सोबत पोकॉ/3019 बारगळ, पोकॉ./2845 चंदु मांजरे आदि सरकारी वाहनाने पेट्रोलिंग करत असतांना त्यांना एक शाईन गाडीवर संशयित इसम जात असतांना आढळून आले. त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता ते पळून जावु लागले. त्यांचा पाठलाग करुन त्यांना विंचूर त्रिफुली येथे पोहवा पैठणकर, पोलीस नाईक संदीप निचळ, पोकॉ. डगळे, पोलीस शिपाई सांगळे, पोलीस मित्र अनिल लांडगे यांना सोबत घेवुन नाकांबदी करुन सदर संशयित मोटारसायकलसह रात्री 02/45 वा ताब्यात घेतले. संशियत इसमांकडे विचारपुस केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिले तेव्हा त्यांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव

1) अनिकेत कैलास मळेकर वय 22 वर्षे, रा. फलॅट नंबर 401. शिवांगण अर्पाटमेंट, रायकर मळा, धायरी, पुणे व 2) नामदेव रामभाउ ढेबे वय- 22 वर्षे, रा. फलॅट नंबर 33, अश्वमेध कॉम्प्लेक्स रायकर मळा, धायरी, पुणे असे सांगितले. त्यांचेसोबत असलेली बॅग चेक केली असता त्यात 03 गावठी बनावटीचे कट्टे (अग्नी शस्त्र) व 09 जिंवत काडतुस मिळाले. त्यांना पोलीस ठाणेस घेवुन येवुन त्यांचेकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सदर कट्टेहे त्यांनी उमर्टी राज्य मध्यप्रदेश येथुन घेवुन ते पुणे जिल्हयात घेवुन जात असलेबाबत कबुली दिली आहे.

सदर आरोपीविरुध्द पोकॉ सुजय बारगळ यांचे फिर्यादीवरुन भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 5/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हाचा पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक भास्कर जनार्दन शिंदे व पोकॉ संदीप डगळे, पोकॉ. शशिकांत निकम हे करीत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे