Breaking
गुन्हेगारीब्रेकिंग

विंचूर परिसरात ४९ लाखांचा एमडी ड्रग्स साठा जप्त

0 4 2 9 5 7

विंचूर एमआयडीसीत ४९ लाखांचा एमडी ड्रग्स साठा जप्त

विंचूर —

ग्रामीण पोलिस अधीक्षकांचे विशेष पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा (नाशिक ग्रामीण) यांच्या संयुक्त पथकाने मोठी आणि धक्कादायक कारवाई केली आहे. विंचूर एमआयडीसी परिसरात एमडी (मेफेड्रॉन) या अमली पदार्थाची विक्री होणार असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती मिळाल्यानंतर टाकलेल्या छाप्यात तब्बल ७०१ ग्रॅम ०५ मिलिग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले.

या कारवाईत ४९ लाख १० हजार ५०० रुपये किमतीचा अमली पदार्थ तसेच दुचाकी, मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण ५० लाख १५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी याकूब खालिद मोमीन (वय ४६, रा. इस्लामपुरा, विंचूर, ता. निफाड) आणि संदेश अंबादास फापाळे (वय ३५, रा. मरळगोई) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

विंचूर एमआयडीसी त्रिफुली ते एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्यावर तसेच इस्लामपुरा, विंचूर (ता. निफाड) परिसरात ही कारवाई करण्यात आली. अवैध धंद्यांविरोधात पेट्रोलिंग सुरू असताना नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक विशेष पथकाला गोपनीय माहिती मिळाली. ही माहिती तात्काळ लासलगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांना कळविण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार जप्त एमडीची किंमत सुमारे ४९ लाख १० हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत कलम ८(क) व २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भास्करराव शिंदे करीत आहेत.

तसेच

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे