Breaking
ई-पेपरमहाराष्ट्रसत्कारसामाजिक

माणुसकी फाउंडेशन व ॲग्रो केअर कृषी मंचाच्या वतीने मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते वसंतराव नाईक कृषी प्रेरणा पुरस्काराचे वितरण

0 4 2 9 5 7

माणुसकी फाउंडेशन व ॲग्रो केअर कृषी मंचाच्या वतीने मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते वसंतराव नाईक कृषी प्रेरणा पुरस्काराचे वितरण

राज्याच्या सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा मुबलक वीज उपलब्ध होणार – मंत्री छगन भुजबळ

निफाड, दि.२० जुलै :- शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने राज्य शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत आहे. विशेषतः शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज ही अतिशय महत्वाची असल्याने दिवसा मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी सौर कृषि पंप योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची अतिशय यशस्वीपणे राबविण्यात येत असून लवकरच शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होईल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

माणुसकी फाउंडेशन आणि ॲग्रो केअर कृषी मंचाच्या वतीने आयोजित कृषी पुरस्कार कार्यक्रम नक्षत्र हॉल निफाड येथे पार पडला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, शिवाजीराव ढेपले,राजाभाऊ शेलार, प्रांत अधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसीलदार विशाल नाईकवाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, भाऊसाहेब बोचरे, विनोद जोशी, बाळासाहेब पुंड, दत्ताकाका रायते, अशोक नागरे, सुरेखा नागरे, सुवर्णा पगार, सुमनताई शेलार, पांडुरंग राऊत, राहुल डुंबरे, ॲग्रो केअर कृषी मंचचे अध्यक्ष भूषण निकम, माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष सागर निकाळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कृषि क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांच्या स्मृतीस अभिवादन करत मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, येवला, निफाडसह परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहे. यामध्ये लासलगाव येथे आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. मात्र अनेकदा कांद्याला भाव न मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत येतात. त्यामुळे कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देऊन शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव मिळण्यासाठी येवला तालुक्यातील चिचोंडी औद्योगिक वसाहतीत ५० एकर जागा कांदा उद्योगासाठी आरक्षित करण्यात आली असून लवकरच हा प्रकल्प सुरू होईल अशी माहिती त्यांनी दिली.

ते म्हणाले की, कृषिप्रधान देशाची खरी ताकद हा शेतकरी बांधव आहे. आपण सर्वजण जाणतो की, भारत हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशात अजूनही बहुतांश लोकांचे जीवन शेतीवर आधारित आहे. शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. बदलत्या हवामानाचा फटका, बाजारातील अस्थिरता, योग्य दर न मिळणे यामुळे शतकरी वर्ग अडचणीत आहे. अशा कठीण परिस्थितीत ॲग्रोकेअर कृषी मंच सारखी संस्था शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाते. ही कौतुकास्पद बाब आहे.

ते म्हणाले की संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेतीचं प्रशिक्षण, सेंद्रिय शेतीचं प्रोत्साहन, मार्गदर्शन, तालुका व जिल्हास्तरीय प्रेरणादायक शेतकऱ्यांचा सन्मान, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण, गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य, महिलांसाठी प्रशिक्षण असे विविध कार्यक्षेत्र हाताळणं ही खरोखरच विलक्षण गोष्ट आहे. त्याचबरोबर पत्रकार सागर निकाळे यांच्या माणुसकी फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम नियमित राबविले जात आहे. या संस्थेचे काम देखील कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराव ढेपले, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, ॲग्रो केअर कृषी मंचचे अध्यक्ष भूषण निकम, माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष सागर निकाळे यांच्यासह मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे