Breaking
क्रिडा व मनोरंजन

‘मन आतले मनातले’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच

१३ फेब्रुवारी रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

0 4 2 9 5 0

‘मन आतले मनातले’ चित्रपटाचा
दमदार ट्रेलर लाँच

१३ फेब्रुवारी रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

अत्यंत वेगळी आणि संवेदनशील कथा, दमदार स्टारकास्ट असलेल्या मन आतले मनातले या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. १३ फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाबाबत ट्रेलरमुळे उत्सुकता अधिक वाढली आहे. प्रेक्षकाचं पुरेपूर मनोरंजन करण्याची हमी चित्रपटाच्या ट्रेलरमधून मिळत आहे. 

सूर्य फिल्म वर्ल्ड प्रस्तुत मन आतले मनातले या चित्रपटाची निर्मिती सुरेन महापात्रा यांनी केली आहे. सुरेन महापात्रा यांनी चित्रपटाचं कथा आणि पटकथा लेखन, तर संवादलेखन मनोज सुधाकर येऊनकर यांनी केले आहे. तर जेम्स अँथनी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. अभिजित मजुमदार यांनी संगीत दिग्दर्शन, डॉ. सुनंदा डिवरे पळवणकर यांनी गीतलेखन केलं आहे. सुदर्शन सेनापती यांनी छायांकन, मलया आणि बिपिन यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. मोनाली पोगाडे यांनी मीडिया हेड म्हणून काम पाहिले आहे. चित्रपटात सुरेन, मानसी नाईक, उपेंद्र लिमये, ऋतुराज फडके, संदीप गायकवाड, कमलेशन सावंत, अरूण नलावडे, यतीन कार्येकर, सिया पाटील,आरव प्रकाश, राजेश आहेर, विनित भोंडे अशी तगडी स्टारकास्ट आहे.  सूर्य फिल्म वर्ल्ड या निर्मिती संस्थेने आजवर ओडिया, हिंदी, तेलुगू, तमिळ, बंगाली भाषांतील चित्रपटांची निर्मिती केली आहे. आता  मन आतले मनातले या चित्रपटातून ही निर्मिती संस्था मराठीमध्ये पदार्पण करत आहे. 

थॅलेसेमिया, गिल्बर्ड सिंड्रोम या आजारावर औषध शोधण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या एका डॉक्टर दांपत्याला औषधाचा शोध लागतो. या आजारांना त्यांचा मुलगाही तोंड देत असतो. शोध लागलेल्या औषधाचा प्रयोग ते आपल्या मुलावर करतात. पण त्या औषधाचा नकारात्मक परिणाम होतो. त्यानंतर वेगवेगळी वळणे घेत कथेत अनेक नाट्यमय घडामोडी घडतात. त्या मुलाचे नेमके काय होते, याचे उत्तर चित्रपटात पहायला मिळणार आहे. 

मन आतले मनातले या चित्रपटाच्या अॅक्शनपॅक्ड टीजरमुळे चित्रपटाविषयी उत्सुकता वाढली होती. खलनायकी भूमिकेतील उपेंद्र लिमये यांच्यासह अनुभवी आणि उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात असल्यानं अभिनयाची जुगलबंदी या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याचं ट्रेलरमधून दिसतं. त्यामुळे मन आतले मनातले हा चित्रपट आता चित्रपटगृहात जाऊन पाहावाच लागणार आहे.

Trailer Link

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे