Breaking
ब्रेकिंग

पिंपळसजवळ कार-दुचाकीची समोरासमोर धडक; आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू, एक जखमी

0 4 5 5 0 9

किरण कुमार आवारे….

शिरवाडे वाकद :- नाशिक – छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पिंपळसजवळ कार आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात निफाड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर त्याचा सहाध्यायी गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

गुरुवार दि.२३ रोजी दुपारी सुमारे अडीच वाजेच्या सुमारास चांदोरी येथून निफाडकडे मोटारसायकलने येत असताना पियुष प्रताप गायकवाड (वय १७) आणि त्याचा मित्र भोर (पूर्ण नाव समजू शकले नाही) हे दोघे मोटारसायकल (क्र. एम.एच १५ के.एफ १७८९) वरून निफाड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडे येत होते. दरम्यान, पिंपळसजवळ समोरून येणाऱ्या नेक्सॉन कार (क्र.एम.एच १५ एस.सी ८५०९) आणि मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दोघेही विद्यार्थी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारासाठी नेत असतानाच पियुषचा दुर्दैवी
मृत्यू झाला. तर जखमी विद्यार्थ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृत पियुष हा निफाड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत फिटर ट्रेडचे शिक्षण घेत होता. त्याच्या पश्चात आई – वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे चांदोरी परिसरासह आयटीआयमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 5 5 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे