Breaking
सत्कार

*विंचूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयास आदर्श विद्यालय व कर्मवीर पारितोषिकाने सन्मानित 

0 3 2 1 2 3

*विंचूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयास सर्वोत्कृष्ठ कामगिरी बद्दल आदर्श विद्यालय व कर्मवीर पारितोषिकाने सन्मानित 

 कर्मवीर भाऊराव पाटील विंचूर विद्यालयाची स्थापना सन १९५९ झाली आहे. शाखेच्या स्थापनेपासून विद्यालयात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी विविध प्रकारचे उपक्रम ,प्रकल्प राबवले जातात , विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे ज्ञान व्हावे म्हणून गुणवत्तापूर्ण रयत गुरुकुल प्रकल्प राबवला जातो विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव मिळावा म्हणून डिजिटल शिक्षण दिले जात आहे, विंचूर व पंचक्रोशीत सर्वोत्कृष्ट शिक्षण देणारे व सर्व आधुनिक सोयीसुविधाने युक्त विद्यालय म्हणून विद्यालयाने नावलौकिक मिळवलेला आहे, परंतु शाखेच्या स्थापनेपासून प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर रयत शिक्षण संस्थेमार्फत दिला जाणारा सर्वोच्च व मानाचा पुरस्कार, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंती निमित्ताने सातारा येथे आयोजित कार्यक्रमात शाळेस सर्वोत्कृष्ठ कामगिरीच्या गौरवार्थ दिले जाणारे ‘कर्मवीर पारितोषिक’ व आदर्श विद्यालय पुरस्कार ,माजी केंद्रीय कृषिमंत्री, खासदार व रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते विद्यालयास सातारा प्रदान करण्यात आला. या सन्मानामध्ये शाखेच्या स्थापनेपासून आजपर्यंत शाखेला लाभलेले स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष, सदस्य, शिक्षण प्रेमी ग्रामस्थ, माजी विद्यार्थी आज पर्यंत विद्यालयास प्राप्त झालेले कार्य कुशल मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मौलिक योगदान आहे या महानुभवांची मेहनत,परिश्रम व विद्यालयाचे विद्यमान कार्यकुशल प्राचार्य देवढे एन ई, पर्यवेक्षक जोपळे के जी ,चांदे आर के लाईफ मेंबर र.शि. संस्था सातारा यांचे मार्गदर्शन व विद्यालयातील सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या मेहनतीने हा सुवर्णयोग प्राप्त झाला आहे. 

ह्या पुरस्कार सोहळ्या प्रसंगी, मा.चंद्रकांत दळवी चेअरमन – र.शि.सं.सातारा, मा.अँड.भगीरथ शिंदे व्हा.चेअरमन – र.शि.सं.सातारा, मा.डॉ अनिल पाटील संघटक – र.शि.सं.सातारा, मा. रामशेठ ठाकूर, सदस्य, मॅनेजिंग कौन्सिल. र.शि. संस्था सातारा,माजी राज्यपाल व मा. खासदार श्रीनिवास पाटील , मान. आमदार शशिकांत शिंदे,विकास देशमुख सचिव र.शि.सं.सातारा . कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलपती श्री. ज्ञानदेव म्हस्के , रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव पवार बी एम, उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव मेनकुदळे साहेब, संस्थेचे ऑडिटर मोरे साहेब, मा.डॉ.सुजितजी गुंजाळ सदस्य, जनरल बॉडी र.शि.सं.सातारा, मा. सुनील मालपाणी सदस्य, र. शि. संस्था उत्तर विभाग अ.नगर यांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य सोहळा कर्मवीर भाऊराव पाटील समाधी स्थळ, सातारा येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला,

शाखेला हा बहुमान शाखा स्थापनेपासून पहिल्यांदाच प्राप्त झाल्यामुळे शाखेचे स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ दरेकर, उपाध्यक्ष कैलास सोनवणे , सदस्य जगदीश जेऊघाले,सदस्य बाळकिसन मालपाणी , सदस्य गंगाधर जेऊघाले , अनिल दरेकर सदस्य स्कूल कमिटी , सरपंच व सदस्य ग्रामपालिका विंचूर व पंचक्रोशी,अध्यक्ष ,सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक संघाचे सर्व कार्यकारिणी सदस्य, विंचूर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पत्रकार, माजी विद्यार्थी, माजी रयत सेवक ,डॉक्टर असोसिएशन सर्वांनी विद्यालयाचे भरभरून अभिनंदन केले .

5/5 - (1 vote)

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे