Breaking
आरोग्य व शिक्षणशैक्षणिकसामाजिक

विद्यार्थ्यांमध्ये संस्कार घडविण्यासाठी गुरुकुल संस्कृती अतिशय महत्वाची – डॉ.शेफाली भुजबळ

डॉ.प्रताप पवार यांच्या 'आयुष्याचे पाठ्यपुस्तक' या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

0 3 2 1 2 3

डॉ.प्रताप पवार यांच्या ‘आयुष्याचे पाठ्यपुस्तक’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

विद्यार्थ्यांमध्ये संस्कार घडविण्यासाठी गुरुकुल संस्कृती अतिशय महत्वाची – डॉ.शेफाली भुजबळ

लासलगाव,दि.१ एप्रिल :- देशात गुरुकुल संस्कृती ही अतिशय प्राचीन काळापासून असून आज काही प्रमाणात गुरुकुल संस्कृतीवर आधारित शैक्षणिक संस्था काम करत आहे. आपली संस्कृती टिकविण्यासाठी तसेच संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्यासाठी गुरुकुल संस्कृती ही अतिशय महत्वाची असून ती टिकली पाहिजे असे प्रतिपादन मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ.शेफाली भुजबळ यांनी केले.

वाहेगाव येथे श्री.नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रताप पवार यांच्या आयुष्याच्या पाठ्यपुस्तक या पुस्तकाचे प्रकाशन डॉ.शेफाली भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात पार पडला. यावेळी आयोजित सोहळ्यात त्या बोलत होत्या.

यावेळी माजी आमदार कल्याणराव पाटील, माजी आमदार नरेंद्र दराडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव,मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, लासलगाव बाजार समितीचे संचालक डी.के.जगताप, डॉ.श्रीकांत आवारे, सुवर्णाताई जगताप, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ.आत्माराम कुंभार्डे, , सोनिया होळकर, अशोक गवळी, सहकार भारतीचे शरद जाधव, मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सुनील देवरे, शिवा सुरासे, सरपंच अरुण न्याहरकर, महावितरणचे कार्यकारी अभियंता व्ही. के.काळुमाळी, डॉ.आर व्ही.सोनवणे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस.बी.देशमुख, स्मिता कुलकर्णी, बालेश जाधव, अमोल पवार, डॉ.स्वप्नील जैन, शंतनु पाटील, सचिन होळकर, दीपक खैरे, सुनील शिंदे, किशोर पाटील, सोहेल मोमिन,डॉ.वैशाली पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ.शेफाली भुजबळ म्हणाल्या की, प्राचीन काळापासून गुरुकुल संस्कृती देशात सुरू आहे. या गुरुकुल संस्कृतीतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळून संस्कारक्षम पिढी घडविण्याचे काम केलं जात आहे. आपण सर्वांनी या संस्कृतीचे जतन केलं पाहिजे आणि ती पुढच्या पिढीकडे सुपूर्त करायला हवी. आज वाढलेली स्पर्धा बघता शैक्षणिक संस्थापुढे देखील मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. अशा वेळी गुरुकुल संस्कृतीच्या माध्यमातून डॉ.प्रताप पवार नेताजी गुरुकुल संस्थेच्या माध्यमातून करत आहेत ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. तसेच डॉ.पवार यांनी निर्माण केलेले साहित्य साहित्य क्षेत्रासाठी अतिशय महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.प्रताप पवार यांनी केले. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधनपर नाटकांचे सादरीकरण केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे