ब्रेकिंग
शेततळ्यात पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

0
4
6
2
0
8
शेततळ्यात पडून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

किरणकुमार आवारे…
शिरवाडे वाकद:- आडगाव रेपाळ ता.येवला येथील तरुण शेतकऱ्याचा शेततळ्यात पाय घसरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत योगेश घमाजी महाले यांनी दिलेल्या खबरीत, त्याचा चुलत भाऊ गणेश वाळुबा महाले वय – ४६ वर्ष रा.आडगाव रेपाळ हा दि.१९ मार्च रात्री ९ वाजेच्या सुमारास जेवण करुन घरातुन निघुन गेला तो रात्री घरी आला नाही म्हणुन, आम्ही दि.२० मार्च रोजी पहाटे गावात तसेच मळ्यात शोध घेतला असता त्याच्या पायातील चप्पल मयताच्या आडगाव रेपाळ शिवारातील शेत गट नं २४ मधील शेततळ्यात दिसुन आल्याने आम्ही सर्व नातेवाईकांनी शेततळ्यामध्ये उतरुन बघितले असता माझा चुलत भाऊ गणेश महाले हा शेततळ्यातील पाण्यात मिळून आला. त्यास औषधोपचार कामी उपजिल्हा रुग्णालय, येवला येथे आणले असता तेथील डॉक्टरांनी त्यास तपासुन मयत घोषित केले आहे. त्यांचे खबरीवरून येवला ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास ए.एस.आय सुनील पवार करीत आहेत.
0
4
6
2
0
8



