Breaking
ब्रेकिंग

आंध्रप्रदेशातील कुप्पम येथील राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणात देशमाने शाळेतील शिक्षक संग्राम सानप सर यांचा सहभाग*

0 4 2 9 5 7

*आंध्रप्रदेशातील कुप्पम येथील विज्ञान गणिताच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणात देशमाने शाळेतील शिक्षक संग्राम सानप सर यांचा सहभाग

विद्यार्थ्यांच्या विज्ञान गणिताच्या शिक्षणाला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान गणिताचे प्रशिक्षण नुकतेच अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन, कुप्पम (आंध्र प्रदेश) या ठिकाणी पार पडले. सदरच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणाचे आयोजन महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग, जिल्हा शिक्षक प्रशिक्षण संस्था, अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. निफाड, मालेगाव, नांदगाव, येवला या तालुक्यातून प्रशिक्षणासाठी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे जनता विद्यालय देशमाने शाळेतील ज्येष्ठ विज्ञान शिक्षक संग्राम सानप सर यांची निवड झाली होती.प्रशिक्षणाचा उद्देश विद्यार्थ्यांना गणित व विज्ञानाच्या मूलभूत संकल्पना नव्या, सृजनशील आणि प्रयोगात्मक पद्धतीने शिकविणे असा होता. विज्ञान गणिताच्या या प्रशिक्षणात कृतीद्वारे व आनंदमयी पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांना संकल्पना शिकविण्याचे तंत्र आत्मसात करण्यात आले. प्रशिक्षणामध्ये विज्ञान गणिताच्या संकल्पना ज्ञानरचनावाद पद्धतीने कृतीद्वारे शिकण्याचे तंत्र शिकवले गेले. प्रशिक्षणात जीवशास्त्र प्रयोगशाळा, रसायन प्रयोगशाळा, अंतराळ शास्त्र प्रयोगशाळा, आर्ट गॅलरी, पर्यावरण , योगा , भौतिक शास्त्र प्रयोगशाळा, गणित प्रयोगशाळा इत्यादी बाबींचे निरीक्षण करण्याची संधी मिळाली होती. या प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. असे प्रशिक्षणार्थी संग्राम सानप सर यांनी सांगितले.

सदरच्या प्रशिक्षणासाठी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे येवला तालुक्याचे संचालक आदरणीय नंदकुमार बनकर साहेब, शिक्षणाधिकारी भास्कर ढोके साहेब, शालेय समितीचे अध्यक्ष कैलास आप्पा जगताप, विद्यालयाचे मुख्याध्यापक गायकवाड एस बी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या होत्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे