Breaking
ब्रेकिंगराजकियसामाजिक

*येवला मतदारसंघातील विविध विकास कामांचा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आढावा

0 3 2 1 2 3

*येवला मतदारसंघातील विविध विकास कामांचा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आढावा

*पिण्याच्या पाण्यासाठी प्रथम प्राधान्य देऊन नियोजन करावे – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ*

*मतदारसंघात सुरू असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या योजना नियोजित वेळेत पूर्ण कराव्यात – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ*

*पुणेगाव डावा कालवा आणि दरसवाडी पोहोच कालवा अस्तरीकारणाचे काम एप्रिल पर्यंत पूर्ण करा – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ*

*मतदारसंघातील एकही घर नळ पाणीपुरवठ्यापासून वंचित राहता कामा नये – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ*

*जलजीवन मिशन अंतर्गत योजनेतील कामांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करा; माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सूचना*

*येवला,दि.२८ फेब्रुवारी :-* मतदारसंघातील प्रत्येक घरात नळाने पाणी उपलब्ध होईल यासाठी योजनांची कामे प्रस्तावित करून ती पूर्ण करण्यात यावी. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्य देऊन नियोजन करण्यात यावे. पुणेगाव डावा कालवा आणि दरसवाडी पोहोच कालवा अस्तरीकरणाचे काम एप्रिल पर्यंत पूर्ण करण्यात यावे अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला संपर्क कार्यालयात अधिकाऱ्यांसमवेत येवला विधानसभा मतदारसंघातील पाणी टंचाई, सुरू असलेल्या सिंचन योजना, जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजना यासह विविध विकास कामांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य हुसेन शेख, जलचिंतन सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन शेलार, प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, मच्छिंद्र थोरात, नांदूर मध्यमेश्वर प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ढोकचवळे, येवला पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी सुरेश पाटेकर, निफाडचे सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील पाटील तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, एल.जी.कदम, देविदास निकम, मंगेश गवळी, सुनील पैठणकर, नितीन गायकवाड अल्केश कासलीवाल, भाऊसाहेब धनवटे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

पुणेगाव डावा कालवा आणि दरसवाडी पोहोच कालवा अस्तरीकारणाचे रखडलेले काम एप्रिल पर्यंत जलद गतीने पूर्ण करण्यात यावे. राजापूर व ४० गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, धुळगाव व १६ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, येवला ३८ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, विंचूर लासलगावसह १६ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना यासह जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत येवला व निफाड तालुक्यातील नळ पाणीपुरवठा योजनांची कामे जलद गतीने पूर्ण करण्यात यावी तसेच कामात दिरंगाई करणाऱ्यांवर आवश्यक ती कारवाई तातडीने करण्यात यावी अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी विंचूर लासलगाव सह सोळा गाव पाणीपुरवठा योजनेच्या सुप्रमा मधील कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या. यामध्ये धरणात पाणी कमी झाल्यानंतर निर्माण होणारी टंचाई होऊ नये यासाठी चॅनल बांधण्याचे काम, जमिनीखालील वारंवार नादुरुस्त होणारी अडीच किलोमीटरची पाईपलाईन बदलणे, पिंपळगाव नजीक येथील नवीन जलकुंभ बांधणे, नवीन ट्रान्सफार्मर बसविण्याचे काम सुरू करण्याच्या सूचना यावेळी अधिकाऱ्यांना केल्या.

यावेळी जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत नळ पाणीपुरवठा योजनांमध्ये प्रत्यक्षात झालेल्या कामापेक्षा जास्तीचे बिल ठेकेदारांना अदा केल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधी बैठकीत केल्या. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दूरध्वनीद्वारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्याशी संपर्क करत या कामांची चौकशी करत संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशा सूचना केल्या.

जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनांमध्ये मतदार संघातील सर्व वाड्या वस्त्या कव्हर झालेल्या आहे का याची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या.प्रत्येक घरी नळाद्वारे पाणीपुरवठ्याचा समावेश नसेल तर रिव्हाईस प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना दिल्या.

या बैठकीत छगन भुजबळ यांनी ओझरखेड डावा कालवा किमी ४९ ते ६३ व त्यावरील वितरीकांची कामे, पुणेगाव डावा कालवा आणि दरसवाडी पोहोच कालवा अस्तरीकरण कामे, टंचाईबाबत आढावा ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची स्थिती, येवला शहर पिण्याच्या पाण्याची स्थिती, येवला शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेतला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे