Breaking
आरोग्य व शिक्षण

डायलिसिसच्या चक्रातून मुक्ती; अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी किडनी प्रत्यारोपण; अवयवदानातून रुग्णाला मिळाली नवजीवनाची नवी संधी

0 4 7 4 6 1

डायलिसिसच्या चक्रातून मुक्ती; अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी किडनी प्रत्यारोपण; अवयवदानातून रुग्णाला मिळाली नवजीवनाची नवी संधी

नाशिक : अंतिम अवस्थेतील किडनी विकारामुळे नियमित डायलिसिसवर अवलंबून असलेल्या एका रुग्णाला यशस्वी किडनी प्रत्यारोपणाद्वारे नव्या आयुष्याची संधी मिळाली आहे. अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथे पार पडलेल्या या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला डायलिसिसच्या दीर्घ आणि कष्टदायक प्रवासातून मुक्ती मिळाली असून उत्तर महाराष्ट्रातील प्रगत किडनी उपचार सेवेमधील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे.

या रुग्णाला दीर्घकाळापासून किडनी विकाराचा त्रास होता आणि त्यासाठी नियमित डायलिसिस सुरू होते. वैद्यकीय तपासण्यांनंतर किडनी प्रत्यारोपण हा सर्वोत्तम उपचार पर्याय असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, रुग्णाच्या पत्नीने किडनी दान करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर संपूर्ण वैद्यकीय प्रक्रियेचे नियोजन करून यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले.

याबाबत माहिती देताना डॉ. विपुल गट्टाणी, वरिष्ठ नेफ्रॉलॉजिस्ट म्हणाले, “किडनी निकामी झाल्यानंतर अनेक रुग्णांना नियमित डायलिसिसवर अवलंबून राहावे लागते. मात्र योग्य दाता उपलब्ध झाल्यास किडनी प्रत्यारोपणामुळे रुग्णाचे जीवनमान लक्षणीयरीत्या सुधारते. आज प्रत्यारोपणानंतर रुग्णाची प्रकृती चांगली असून त्यांना अधिक सक्रिय आणि स्वतंत्र जीवन जगण्याची संधी मिळणार आहे.”

डॉ. अभिजित मोरे यांनी सांगितले, “किडनी प्रत्यारोपण ही केवळ शस्त्रक्रिया नसून त्यामध्ये रुग्ण, दाता आणि वैद्यकीय टीम यांचा एकत्रित प्रवास असतो. योग्य नियोजन, सातत्यपूर्ण फॉलोअप आणि शस्त्रक्रियेनंतरची काळजी यामुळे उत्कृष्ट परिणाम साध्य होतात. या प्रकरणात रुग्णाची सुधारणा समाधानकारक आहे.”

अवयवदानाबाबत जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित करताना डॉ. किशोर वाणी म्हणाले, “भारतात अजूनही अवयवदानाची गरज आणि उपलब्धता यामध्ये मोठी तफावत आहे. योग्य माहिती आणि जनजागृतीमुळे अनेक रुग्णांना वेळेत उपचार मिळू शकतात. अवयवदान ही समाजासाठी अत्यंत मौल्यवान देणगी आहे.”

या यशस्वी उपचारामागील टीमवर्कविषयी बोलताना डॉ. श्याम तलरेजा यांनी सांगितले, “किडनी प्रत्यारोपणासारख्या जटिल प्रक्रियेमध्ये नेफ्रॉलॉजिस्ट, सर्जन, अॅनेस्थेशिया तज्ज्ञ, क्रिटिकल केअर टीम आणि नर्सिंग स्टाफ यांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा असतो. अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या बहुविशेषज्ञ सेवांमुळे अशा उपचारांमध्ये सातत्याने यश मिळत आहे.”

या प्रसंगी उपस्थित असलेले डॉ. विजय कराडे, वरिष्ठ फिजिशियन तथा अध्यक्ष, नाशिक रोड फिजिशियन असोसिएशन यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन करताना सांगितले, “अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल सातत्याने प्रगत वैद्यकीय सेवा, शैक्षणिक उपक्रम आणि Quaternary Care सुविधांच्या माध्यमातून नाशिकच्या आरोग्यसेवेला नवे आयाम देत आहे. किडनी प्रत्यारोपणासारख्या जटिल उपचारांचे यशस्वी व्यवस्थापन हे नाशिकसाठी अभिमानाची बाब आहे. अशा उपक्रमांमुळे महानगरांमधील आरोग्यसेवा आता स्थानिक स्तरावर उपलब्ध होत आहे.”

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे सेंटर हेड श्री. अनुप त्रिपाठी यांनी सांगितले, “प्रगत अवयव प्रत्यारोपण सेवा उत्तर महाराष्ट्रात उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे. यशस्वी किडनी प्रत्यारोपण हा त्याच दिशेने टाकलेला आणखी एक भक्कम पाऊल आहे. रुग्णांना त्यांच्या शहरातच उच्च दर्जाची आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.”

या यशस्वी प्रत्यारोपणामुळे पुन्हा एकदा हे सिद्ध झाले आहे की, योग्य वैद्यकीय सुविधा, अनुभवी तज्ज्ञांची टीम आणि वेळेवर घेतलेले निर्णय यांमुळे गंभीर आजारांवरही यशस्वी मात करता येते. तसेच अवयवदानाविषयी सकारात्मक दृष्टीकोन आणि जागरूकता निर्माण करण्याची गरज या निमित्ताने अधोरेखित झाली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 4 6 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे