*बुलेट प्रेमी रॉयल रायडर्स संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात*
*बुलेट प्रेमी रॉयल रायडर्स संस्थेचा वर्धापन दिन उत्साहात*
किरण घायदार, नाशिक…
राजू रूपवते या संस्थे चे अध्यक्ष आहे व खऱ्या अर्थाने बुलेट प्रेमी आहे . त्याच्याकडे पंधरा वेगवेगळ्या प्रकारच्या बुलेट आहेत. आज पर्यंत या संस्थेच्या बुलेट प्रेमी चालकांनी – लेह – लडाख ,नेपाळ व गेले अनेक वर्ष गोवा येथे भरणाऱ्या बुलेट प्रेमी मेळाव्यात सहभाग नोंदविला आहे.
26/ 11 /12 रोजी त्यांनी संस्था स्थापन केली. तेव्हापासून दरवर्षी वेगवेगळ्या राइड्स चे आयोजन ते करत असतात .त्यांचं वैशिष्ट्य हे की प्रत्येक बुलेट प्रेमी सर्व सुरक्षेचे साधन वापरत बुलेट राइड्स मध्ये सामील होत असतो .तसेच वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये देखील त्यांचा सहभाग वाखाणण्यासारखा असतो.
गरुड झेप प्रतिष्ठान नाशिकचे अध्यक्ष डॉ संदीप भानोसे यांच्या हस्ते रॉयल रायडर्सच्या राजु रूपवते, शांताराम काळे,राकेश अहीरे ,शिव पवार,हितेश कोमरे ,राना महाले ,कलपेश पारीक ,राजु जाधव ,जमीर सैयद ,शरद रोकडे ,सचीन वटाने ,हूसेन तांबळी रायडर्सचा सन्मान करण्यात आला.
डॉ संदीप भानोसे यांनी आपल्या भाषणामध्ये सुरक्षा साधनांचा सर्व रायडर्सने भविष्यामध्ये काटेकोरपणे वापर करावा व राईड करताना पर्यावरणाचा , निसर्गाचा आनंदही लुटावा असा संदेश दिला. गब्बर फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन जगताप यांनी सर्व रायडर्स ला पुष्पहार घालून सन्मानित केले. त्यानंतर केक कापून वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
विद्याकांत कूलकर्णी, कुणाल कांबळे,पपू गोराडे ,नितीन सिरसाठ ,संतोष पौडवाल ,बाबूजी शेख ,देवगूरू गांगोडे ,योगेश पवार कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले.