Breaking
ब्रेकिंग

आयसीआयसीआय लोम्बार्डकडून मायक्रो-ऑफिस नेटवर्कचा विस्तार, विमा सुलभतेसाठीची वचनबद्धता आणखी दृढ

0 4 2 9 5 7

आयसीआयसीआय लोम्बार्डकडून मायक्रो-ऑफिस नेटवर्कचा विस्तार, विमा सुलभतेसाठीची वचनबद्धता आणखी दृढ

गुवाहाटी, पटना, वापी, नाशिक, पुणे आणि डेहराडूनला नवीन मायक्रो-ऑफिसचा शुभारंभ

नाशिक -भारतात जनरल विमा क्षेत्रातील आघाडीच्या खासगी कंपन्यांमध्ये समाविष्ट असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सने बोंगाईगाव (गुवाहाटी), धरमपूर (वापी), हाजीपूर (पाटणा) कळवण आणि सिन्नर (नाशिक), कात्रज आणि राजगुरुनगर (पुणे) आणि विकासनगर (डेहराडून) यासारख्या छोट्या गावांमध्ये सुक्ष्म स्वरुपातील नवीन कार्यालये (मायक्रो ऑफिसेस) उघडत देशभर आपल्या सेवेचा आणखी विस्तार केला आहे. देशातील विविध भागात असलेल्या सुमारे १०० मायक्रो कार्यालयांचे कंपनीचे जाळे या विस्तारातून आणखी सक्षम झाले आहे. निमशहरी, ग्रामीण आणि सेवेपासून वंचित प्रदेशात सर्वसाधारण (जनरल) विमा योजना सहजरित्या उपलब्ध होण्यासाठी आयसीआयसीआय लोम्बार्डची वचनबध्दता या धोरणात्मक विस्तारातून प्रतिबिंबित झाली आहे.

कंपनीला आपल्या ग्राहकांच्या त्याचबरोबर भागीदारांच्या अधिकाधिक नजीक आणण्याच्या दृष्टीकोनातून मायक्रो-ऑफिसचे हे प्रारूप कार्यान्वित करण्यात आलेले आहे. या प्रारूपामुळे कंपनीला सोप्या पध्दतीने झटपट आणि समुदाय-केंद्रित सेवा प्रदान करता येत आहे. या कार्यालयांमुळे अगदी अतिदूरच्या ठिकाणांशी कंपनीचा संपर्क वाढणार आहे. तसेच स्थानिक बाजारपेठांशी सखोल संबंध प्रस्थापित होणार आहे आणि प्रत्येक प्रदेशाच्या विशिष्ट गरजांची दखल घेतले गेलेले अनुकूलित विमा पर्याय कंपनीला विकसित करता येणार आहे. ग्राहकांना गरज पडताच तत्काळ मदत प्रदान करण्याबरोबरच विश्वासावर आधारलेल्या संबंधांना प्रोत्साहन देत ही मायक्रो-ऑफिस अधिकाधिक घटकांत विम्याची व्याप्ती वाढवण्यात एक महत्त्वाचा प्रेरक घटक म्हणून भूमिका बजावत आहेत.

कंपनीच्या या विस्ताराबद्दल टिप्पणी करताना आयसीआयसीआय लोम्बाडचे रिटेल आणि सरकारी विभागाचे प्रमुख आनंद सिंघी म्हणाले, स्थानिक गरजांना अनुसरून तसेच ग्राहकांना उपयुक्त ठरतील अशा पध्दतीने विमा योजनांची उपलब्धता अधिकाधिक प्रमाणात विस्तारण्याबाबत आमची वचनबध्दता या कार्यालयांच्या विस्तारलेल्या जाळ्यातून प्रकट होते. आमचे ग्राहक जिथे राहतात, काम करतात आणि वित्तीय निर्णय घेतात, अशा भौगोलिक ठिकाणीच ही कार्यालये सुरु करणे हा एक धोरणात्मक बदल दर्शवितो. प्रत्यक्ष मैदानात उतरत ग्राहकांशी संपर्क साधण्याच्या आमच्या कार्यपध्दतीला बळकटी देताना आम्ही आमच्या एजंटना विविध सोयींनी सुसज्ज करत आहोत, तसेच विम्याबाबत अधिकाधिक जागरूकतेतून विविध समुदायांना सक्षम करत आहोत. तसेच त्यांना अधिक सहजपणे आणि विश्वासाच्या भावनेतून गुणवत्तापूर्ण विमा संरक्षण उपलब्ध होण्यावरही आम्ही भर देत आहोत. भारताची ही वाढणारी बाजारपेठ विकसित होत असताना, ग्राहकांशी अधिकाधिक स्नेहाचे संबंध आणि त्यांना वैयक्तिक सेवा प्रदान करणे या बाबी ग्राहकांच्या अपेक्षांचा नवे रुप देणार आहेत आणि आम्ही तत्काळ सेवा, नावीन्यपूर्णता आणि उद्देशांच्या आधारे हा प्रवास पुढे नेण्यासाठी वचनबध्द आहोत.”

‘विश्वास आणि सुरक्षितता, आता तुमच्या आवाक्यात’ या संकल्पनेशी मिळतेजुळते मायक्रो-ऑफिसचे हे जाळे आयसीआयसीआय लोम्बार्डच्या देशव्यापी कार्यक्षमतांना अधिकाधिक स्थानिक दृष्टीकोनातून एकत्र आणते. ग्राहकांशी नजीकचे संबंध आणि कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती हे घटक आर्थिक निर्णयांवर लक्षणीय प्रभाव पडणाऱ्या बाजारपेठांमध्ये हा उपक्रम अधिक जागरूकता निर्माण करण्यावर, विम्याबाबत शिक्षित करण्याबरोबरच वैयक्तिक सेवा वितरणावर अधिकाधिक भर देतो. तसेच आयआरडीएआयच्या ‘२०४७ पर्यंत सर्वांसाठी विमा’ हा दृष्टिकोन प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी कंपनीच्या वचनबद्धतेलासुध्दा अधिक बळकटी देतो.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे