Breaking
क्रिडा व मनोरंजन

श्रुती आनंद म्हणाली, ‘मेहंदी वाला घर’ मधल्या लग्न प्रसंगाचे चित्रण करताना मला मी खरोखर वधू असल्यासारखे वाटले!”

0 3 2 1 2 3

श्रुती आनंद म्हणाली, ‘मेहंदी वाला घर’ मधल्या लग्न प्रसंगाचे चित्रण करताना मला मी खरोखर वधू असल्यासारखे वाटले!”

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मेहंदी वाला घर’ मालिकेत प्रस्तुत केलेली उज्जैन येथील एका अग्रवाल कुटुंबाची हृदयस्पर्शी कहाणी बघताना प्रेक्षक रंगून गेले आहेत. अनेक अडथळ्यांनंतर अखेरीस मौली (श्रुती आनंद) आणि राहुल (शहजाद शेख) यांचे नाते समस्त अग्रवाल कुटुंबाने स्वीकारले आहे, ज्याला अपवाद फक्त राहुलची आई, तन्वी हिचा! मौली आणि राहुल विवाह बंधनात बांधले गेले आहेत, आणि त्या निमित्ताने हा लग्न सोहळा साजरा करण्यासाठी संपूर्ण अग्रवाल कुटुंब एकत्र आले आहे.

मौलीला अनेक वर्षे आपल्या कुटुंबापासून वंचित राहिली आहे. अखेरीस ‘मेहंदी वाला घर’च्या रूपात तिला ते हवहवेसे प्रेम आणि एकोपा मिळाला आहे. आणि या ‘खास प्रसंगा’साठी कधी काळी जानकी मा ने तिच्या स्वतःच्या विवाहात परिधान केलेले सुंदर लाल रंगाचे वधू वस्त्र मौली परिधान करणार आहे.

मौलीची भूमिका करणारी श्रुती आनंद आपल्या वधू पोशाखाविषयीचा उत्साह व्यक्त करताना म्हणते, “मौलीसाठी हा विवाह म्हणजे फार विशेष सोहळा आहे. या सोहळ्यामुळे तिचे केवळ राहुलशी मिलन होणार नाही तर तिला हवे असलेले कुटुंब देखील तिला आता मिळणार आहे. अगदी लहानपणी तिचे आईवडील तिने गमावले आहेत आणि ऐन लग्नाच्या दिवशी मानसने देखील तिला त्यागले होते. यामुळे मानसीच्या जीवनात कुटुंबाच्या अभावी एक पोकळी निर्माण झाली होती. पण आता, तिला हवे असलेले सगळे सुख तिला भरभरून लाभले आहे कारण ज्याच्यावर प्रेम केले, त्याच्याशी तिचा विवाह होत आहे. जसे भारतीय कुटुंबांमध्ये आपली आई किंवा आजी यांच्याकडून परंपरेने चालत आलेली एखादी वस्तू मुलीला मिळते त्याचप्रमाणे मौली जानकी मा चा तिच्या लग्नातील लहेंगा आपल्या लग्नात परिधान करणार आहे. हे शूटिंग करत असताना मला खूप उत्साह वाटत होता आणि त्याचवेळी मी भावुकही झाले होते. थोडक्यात, माझी मनःस्थिती खऱ्याखुऱ्या वधूसारखी झाली होती- हे सुंदर लाल वधूवस्त्र लेवून आपल्या पतीची प्रतीक्षा करणारी वधू! ही मौलीची परिकथाच आहे जणू, आणि मला खात्री आहे की, मालिकेच्या आगामी भागांमध्ये विवाह सोहळ्याची धमाल उलगडताना बघताना प्रेक्षक रंगून जातील.”

बघत रहा, ‘मेहंदी वाला घर’ दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9.30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे