Breaking
क्रिडा व मनोरंजनसामाजिक

इंडियन आयडॉल 15 ने जाहीर केली आपल्या टॉप 15 स्पर्धकांची नावे

0 1 5 0 8 3
इंडियन आयडॉल 15 ने जाहीर केली आपल्या टॉप 15 स्पर्धकांची नावे; आपल्या गायन प्रतिभेने हे स्पर्धक हा मंच दणाणून सोडतील!
 
 मंच सजला आहे आणि स्पॉटलाइट चमकू लागला आहे कारण सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘इंडियन आयडॉल’ या प्रसिद्ध गायन रियालिटी शो च्या 15 व्या सीझनमधल्या टॉप 15 स्पर्धकांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. ऑडिशन आणि थिएटर राऊंडमध्ये मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या परफॉर्मन्सेसच्या झंझावातानंतर परीक्षकांच्या पॅनलवरील डायनॅमिक बादशाह, सुरेल गायिका श्रेया घोषाल आणि रॉकस्टार विशाल ददलानी यांनी सर्वोत्तम 15 स्पर्धक निवडले आहेत, जे या मंचावर आणि येथून आणखी पुढे जाण्यासाठी उत्सुक आहेत. 
 
लोकांचे लक्ष वेधून घेण्यात, त्यांचे मनोरंजन करण्यात आणि त्यांना प्रभावित करण्यात तरबेज असलेले आणि केवळ गान कौशल्य नाही, तर त्या पलीकडे जाणारे हे असामान्य परफॉर्मर या स्पर्धेच्या पुढच्या टप्प्यात मंचावर धमाल उडवून देण्यासाठी येत आहेत. हे टॉप 15 स्पर्धक आहेत – स्नेहा शंकर, मानसी घोष, ज्योतीप्रकाश ओझा, रंजिनी सेन गुप्ता, शुभजीत चक्रवर्ती, रितिका राज, सृजन पोरैल, ईप्सित पाटी, वास्तव कुमार, अनिरुद्ध सुस्वरम, चैतन्य देवढे, मिसमी बोसू, विश्वरूप बॅनर्जी, प्रियांशु दत्ता आणि मयूरी साहा.
 
टॉप 15 मध्ये पोहोचलेली प्लॅटिनम माइक मिळवणारी आयडॉलची पहिली स्पर्धक स्नेहा शंकर म्हणजे ‘आयडॉल की स्टार कलाकार’ ही भारतीय चित्रपटातील संगीतकार आणि गायक राम शंकर यांची मुलगी आहे. राम शंकर यांनी विशेषतः बॉलीवूडमध्ये काम केले आहे आणि भारतीय संगीत क्षेत्रात आजही ते योगदान देत आहेत. मानसी घोष ही कोलकाताहून आलेली एक गुणी गायिका आहे. ती ‘आयडॉल की क्रेझी गर्ल’ म्हणून ओळखली जाते. आपले ज्ञान, उत्तम वर्तन आणि मांसाहारी भोजनाबद्दलचे तिचे प्रेम यामुळे परीक्षक प्रभावित झाले आहेत. भुवनेश्वरहून आलेला ज्योतीप्रकाश ओझा हा अष्टपैलू मुलगा ‘आयडॉल का ग्वाला ज्वाला’ म्हणून ओळखला जातो. त्याने विविध शोज आणि स्पर्धांमध्ये परफॉर्म केले आहे. त्याला प्राण्यांबद्दल विशेष प्रेम आहे. स्वतःच्या बाबतीत काहीशा असुरक्षित असलेल्या या गुणी मुलाचे परीक्षकांनी तोंड भरून कौतुक केले आहे.
 
रंजिनी सेनगुप्ता ला ‘आयडॉल की मल्टीव्हर्स की रानी’ हे नाव मिळाले आहे. थिएटर राऊंडमध्ये आपल्या गायनाने तिने अतिथी परीक्षक नीती मोहनला एका वेगळ्याच जगाचा अनुभव दिला होता. ती एक अप्रतिम संगीतकार आणि शिक्षिका आहे आणि तिची स्वतःची ओरिजिनल गाणी स्पॉटिफाय सारख्या मंचांवर वाजली आहेत. शुभजीत चक्रवर्ती हा ‘आयडॉल का पानवाला’ आहे. हा गुणी गायक चांगुअल गावातून आला आहे आणि त्याचे एक पानाचे दुकान आहे. इंडियन आयडॉल सीझन 15 मध्ये आपली छाप उमटवण्यास तो आतुर आहे. रितिका राज म्हणजे ‘आयडॉल की बसंती’ पटणाहून आलेली एक करारी तरुणी आहे. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी तिने इंडियन आयडॉल सीझन 6 मध्ये टॉप 5 स्पर्धकांत स्थान मिळवून स्पॉटलाइट आपल्याकडे आकर्षित केला होता. आणि आता इंडियन आयडॉल 15 मध्ये हा किताब जिंकण्यासाठी ती सरसावली आहे.
 
सृजन पोरैल म्हणजे आयडॉल का NGO (नो गर्लफ्रेंड ऑर्गनायझेशन). त्याने ऑडिशनदरम्यान प्लॅटिनम तिकीट मिळवून थेट टॉप 15 मध्ये स्थान मिळवले होते. त्यानंतर येतो ईप्सित पाटी, ‘आयडॉल का सुरों का स्ट्राइकर’. तो एक व्यावसायिक गायक असून गीत मिलन बॅंडचा संस्थापक देखील आहे. लवकरच तो SOA कॉलेज, भुवनेश्वर येथून मार्केटिंग आणि फायनॅन्समध्ये MBA चा अभ्यास सुरू करणार आहे. वास्तव कुमार ‘आयडॉल का 50 तोला परफॉर्मर एक बुजरा आणि अंतर्मुख कलाकार आहे. ज्याने वयाच्या पाचव्या वर्षी गायला सुरुवात केली होती. आपल्या कुटुंबाच्या सांगीतिक वारशाने प्रेरित होऊन तो आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या स्पर्धेत आला आहे. अनिरुद्ध सुस्वरम म्हणजे ‘आयडॉल का सुर-स्वरम’ करनूल, आंध्र प्रदेशातून आलेला 29-वर्षीय अनिरुद्ध असामान्य प्रतिभेचा धनी आहे आणि पूर्ण वेळ गाण्याची कारकीर्द करण्यासाठी आपली रिस्क अॅनालिस्टची नोकरी तो सोडून आला आहे.
 
चैतन्य देवढे म्हणजे ‘आयडॉल का डोका फोडू परफॉर्मर’ आळंदीहून आला आहे. त्याचे वारकरी संप्रदायाचे घराणे असून अत्यंत आध्यात्मिक आणि सांगीतिक पार्श्वभूमी त्याला लाभली आहे. एका आश्रमात तो वाढला आहे आणि लहान मुलांना तो भजन शिकवतो आणि व्होकल ट्रेनिंग देतो. तबला आणि पखवाज देखील तो उत्तम वाजवतो. ‘आयडॉल की जिद्दी गर्ल’ मिसमी बोसू गुवाहाटीहून आलेली एक प्रतिभावान गायिका आहे. न्यूमरॉलॉजीवर तिचा विश्वास आहे आणि इंडियन आयडॉल 15 मध्ये आपला प्रवास सुरू करणीस ती उत्सुक आहे.
 
‘आयडॉल की लूप वाली आवाज’ म्हणजे विश्वरूप, जो जनाई येथून आलेला, गाण्याचा ध्यास घेतलेला गायक आहे. त्याला त्याच्या मोहक आवाजामुळे आत्ताच ऑफर्स मिळू लागल्या आहेत. आपली कौशल्ये पारजून त्याने उपशास्त्रीय आणि बॉलीवूड शैलीचे अनोखे मिश्रण विकसित केले आहे. बादशाहच्या गायन शैलीने प्रभावित झालेला आणि त्याच्यासारखेच बनण्याचे स्वप्न बाळगणारा ‘आयडॉल की फीलवाला परफॉर्मर’ प्रियांशु दत्ता यूट्यूबवरून गाणे शिकला आहे आणि आता स्वतः एक ब्रॅंड बनण्यासाठी वाटचाल करत आहे. मयूरी साहा हिला देखील प्लॅटिनम माइक मिळाला होता. कोलकाता येथील टॉलीगंज या छोट्या शहरातून आलेली ती होतकरू गायिका आहे. आपल्या अप्रतिम गायन प्रतिभेने तिने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. ‘आयडॉल की क्लासिकल क्वीन’ म्हटल्या जाणाऱ्या मयूरीचा प्रसिद्धीचा प्रवास सुरू झाला तो, एका प्रसिद्ध गायकाच्या कॉन्सर्टमध्ये तिची श्रेया घोषालशी गाठ पडली, तेव्हापासून.
 
शिखराकडे जाणारा हा प्रवास अद्भुत प्रतिभा आणि परिश्रमाने भरलेला आहे. प्रत्येक स्पर्धकाने आपले असामान्य कौशल्य आणि सर्जनशीलता दाखवून दिली आहे. त्यामुळे परीक्षकांसाठी निवड प्रक्रिया फार अवघड होऊन बसली होती. ही स्पर्धा यापुढे अधिकाधिक रोमांचक होत जाणार आहे कारण हे सगळे गुणी गायक आपले कौशल्य पणाला लावतील आणि इंडियन आयडॉल हा प्रतिष्ठित किताब जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील.
 
 बघत रहा, इंडियन आयडॉल 15 दर शनिवारी आणि रविवारी रात्री 9 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 5 0 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे