Breaking
क्रिडा व मनोरंजनसामाजिक

२९ नोव्हेंबरला ‘डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन’चे आयोजन थीम टी-शर्ट आणि मेडलचे अनावरण

0 5 2 0 9 3

२९ नोव्हेंबरला ‘डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन’चे आयोजन
थीम टी-शर्ट आणि मेडलचे अनावरण……

नाशिक २४ ऑक्टोबर २०२६ : आरोग्य, मैत्री आणि एकजुटीचा संदेश देणाऱ्या ‘डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन’चे तिसरे पर्व येत्या २९ नोव्हेंबर २०२६ रोजी डोंबिवलीत आयोजित करण्यात आले आहे. ‘डोंबिवली शहराचा उत्सव’ ही संकल्पना केंद्रस्थानी असलेल्या या पर्वाच्या तयारीला वेग आला आहे. दुर्गाष्टमीचे औचित्य साधून भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ‘नमो रमो नवरात्री’च्या प्रांगणात या उपक्रमाच्या थीम टी-शर्ट आणि मेडलचे अनावरण करण्यात आले.

‘कल्याण डोंबिवली रनर्स’ (KDR) यांच्या वतीने आणि ‘डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार’ यांच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. शहरातील नागरिकांना एकत्र आणणे, राज्यातील धावपटूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि धावण्याच्या माध्यमातून आरोग्य, मैत्री व बंधुभावाची भावना वाढवणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यंदा ‘डोंबिवली शहराचा उत्सव’ या संकल्पनेतून डोंबिवलीचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, कलेची आवड, क्रीडाप्रेम आणि आरोग्याविषयीची जागरूकता यांचे दर्शन घडणार आहे. कल्याण-डोंबिवलीसह संपूर्ण महाराष्ट्रातील धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या उपक्रमाच्या मागील दोन पर्वांमध्ये सुमारे ६ हजार धावपटूंनी सहभाग घेतला होता. यंदा हा आकडा १० हजारांपर्यंत नेण्यासाठी आयोजक प्रयत्नशील आहेत.” असेही कल्याण डोंबिवली रनर्सच्या वतीने रविंद्र सकपाळ यांनी सांगितले.

“सर्व वयोगटांमधील व्यावसायिक धावपटूंसोबतच फिटनेसप्रेमी, कुटुंबे आणि मुलांपर्यंत सर्वांना सहभागी होता यावे, यासाठी या रनिंग इव्हेंटमध्ये २१.१ किमी, १० किमी व ५ किमी या टाईम रन आणि ५ किमी व १.६ किमी फन रन अशा ५ रनिंग कॅटेगरीज उपलब्ध असतील. टाईम रन विजेत्यांसाठी सुमारे ३ लाख रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.” अशी माहिती कल्याण डोंबिवली रनर्सच्या वतीने सुरज शेट्टी यांनी दिली.

“विशेष म्हणजे, ८ ते १६ वयोगटातील मुलांसाठी १.६ किलोमीटर फन रन पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आली आहे. लहान वयापासूनच मुलांना मैदानी उपक्रम आणि व्यायामाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यात शिस्त, आत्मविश्वास आणि तंदुरुस्तीचे महत्त्व रुजावे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. अधिकाधिक मुलांनी आणि कुटुंबांनी या आरोग्यदायी उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. वयोगटानुसार पारितोषिकांची रक्कम आणि सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइट व Instagram पेजवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.” असेही कल्याण डोंबिवली रनर्सच्या वतीने रविंद्र सकपाळ यांनी सांगितले.

‘डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन २०२६’ला ठाणे जिल्हा ॲथलेटिक असोसिएशनची मान्यता असणार आहे. या रनमध्ये नोंदणी करणाऱ्या प्रत्येक सहभागीला ड्राय-फिट टी-शर्ट, फिनिशर मेडल, हायड्रेशनची सुविधा आणि अल्पोपहार देण्यात येणार आहे. टाईम रन श्रेणीतील धावपटूंना टायमिंग चिप आणि क्वॉलिफिकेशन सर्टिफिकेटही मिळेल. याशिवाय, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या धावपटूंना पार्टिसिपेशन सर्टिफिकेटसह त्यांचे फोटोही विनामूल्य उपलब्ध करून दिले जाणार आहेत, जेणेकरून प्रत्येकाला आपल्या सहभागाच्या आणि यशाच्या आठवणी जपता येतील. यासोबतच धावपटूंना सुरक्षित आणि नियोजनबद्ध अनुभव मिळावा, यासाठी आयोजकांकडून विशेष काळजी घेतली जाणार आहे. स्पर्धेचा मार्ग लवकरच जाहीर करण्यात येईल.” अशी माहिती कल्याण डोंबिवली रनर्स यांच्या वतीने सुरज शेट्टी यांनी दिली.

“‘डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन २०२६’मध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक धावपटूंनी ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील अनुभवी आणि नवोदित धावपटू, मुले, पालक तसेच ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. नोंदणीसाठी www.dombivlikarfriendshiprun.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन रजिस्ट्रेशन करावे.”, असे आवाहन कल्याण डोंबिवली रनर्सच्या वतीने रविंद्र सकपाळ यांनी केले आहे.

” ‘डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन’ ही केवळ धावण्याची स्पर्धा नसून शहरातील नागरिकांना एकत्र आणणारा उत्सव आहे. यंदाच्या पर्वातून फिटनेस, मैत्री यासोबतच डोंबिवलीच्या संस्कृतीचा सुंदर संगम अनुभवायला मिळणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धावपटूंचा उत्साह वाढवावा आणि डोंबिवलीच्या एकजुटीचा उत्सव साजरा करावा”, असे आवाहन आमदार रविंद्र चव्हाण यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 2 0 9 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे