॥ ज्ञानसागरातील राजहंस॥ प्राचार्य नंदकुमार एकनाथ देवढे
॥ ज्ञानसागरातील राजहंस॥
प्राचार्य देवढे नंदकुमार एकनाथ
– रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय विंचूरचे प्राचार्य देवढे नंदकुमार एकनाथ हे प्रमुख म्हणून ठरले ” कर्मवीर चषकाचे मानकरी ” यानिमित्ताने त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा टिपलेला हा वेगळेपणा .
प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व पद्मभूषण कर्मवीर आण्णांनी लावलेल्या ज्ञानरूपी वटवृक्षाच्या रोपट्याचे संवर्धन करताना नाशिक जिल्ह्यातील शिक्षणाच्या ज्ञान पंढरीत ज्यांचे अमूल्य असे योगदान आहे . निफाड तालुक्याला सुपरिचित असलेल्या एका शेतकरी व सुसंस्कृत कुटुंबात माननीय प्राचार्य देवढे नंदकुमार एकनाथ यांचा जन्म दिनांक ०१ जून १९७० रोजी वाकी ता . चांदवड येथे झाला . त्यांचे प्राथमिक शिक्षण वाकी या गावी झाले . माध्यमिक शिक्षण लासलगाव येथे झाले .उच्च माध्यमिक शिक्षण राहता येथे झाले . महाविद्यालय शिक्षण कला व वाणिज्य महाविद्यालय लासलगाव येथे झाले .
माननीय देवढे सरांनी शिक्षणाच्या या ज्ञानपंढरीत माध्यमिक विद्यालय पाचोरा येथे इंग्रजी विषयाच्या अध्यापनाने ज्ञानदानाला सुरुवात केली. यानंतर सरांनी सन २८ जून १९९६ मध्ये रयत शिक्षण संस्थेत प्रवेश करून न्यू इंग्लिश स्कूल टाकळी विंचूर तालुका निफाड येथे विनाअनुदानित तत्त्वावर मुख्याध्यापक म्हणून सन २८ जून १९९६ ते ३१ मे २००७ सेवा केली . ग्रामस्थांच्या मदतीने एका घरात भरणाऱ्या या शाळेचे सर मुख्याध्यापक झाले .सर सलग बारा वर्षे तिथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते . पण या बारा वर्षाच्या काळात पालक ; ग्रामस्थांच्या मदतीने व स्वतः पदर मोड करून या ज्ञानसागराच्या राजहंसाने शाळेची इमारत उभी केली . इयत्ता आठवी ते दहावी विनाअनुदानित असलेली शाळा गुणवत्तेच्या जोरावर सरांनी अनुदानित तत्त्वावर आली व पुढे इयत्ता पाचवी ते दहावी अनुदानित तत्त्वावर शाळा आणून छान पद्धतीने चालविली .
संस्थेच्या ध्येय धोरणानुसार माननीय देवढे सरांनी बारा वर्षानंतर पुन्हा मुख्याध्यापक म्हणून रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यात न्यू इंग्लिश स्कूल नागाव येथे सन २००७ ते सन २००८ एक वर्ष सेवा केली .या काळात लोकवर्गणीतून दहा लाख रुपये जमा करून एका वर्ग खोलीचे बांधकाम सुरू केले . त्यानंतर पुन्हा सरांची बदली होऊन १ जून २००८ ते ३१ में २००९ पारनेर तालुक्यात टाकळी ढोकेश्वर येथे मुख्याध्यापक म्हणून काम केले. पण एकाच वर्षात या ज्ञानरूपी भगीरथाने नवीन इमारतीचे काम पूर्ण करून दाखविले .
माननीय देवढे सरांनी एक उत्तम प्रशासक म्हणून की काय शाळा सुधारण्याचा जणू काही वसाच घेतला होता . पुढे त्यांची बदली निफाड तालुक्यात न्यू इंग्लिश स्कूल रुई येथे मुख्याध्यापक म्हणून १ जून २००९ ते ०७ जून२०१९पर्यंत काम केले. रुईच्या या ज्ञान पंढरीत या कर्मवीराच्या ज्ञानरूपी वारकऱ्यांने प्रचंड मेहनत करून उत्तम प्रशासनाच्या अनुभवाने ग्रामस्थांच्या व पालकांच्या सहकार्याने सी .एस .आर फंडातून एक कोटी पंचवीस लाख रुपये निधी मिळवून भव्यदिव्य अशा इमारतीचे अर्थात ज्ञान मंदिराचे काम पूर्ण केले .
याच कालखंडात प्राचार्य देवढे सरांनी या शाळेला सर्व सेवकांच्या सहकार्याने रयत शिक्षण संस्थेचा सर्वोत्कृष्ट गुणवंत शाळा हा ” कर्मवीर पारितोषिका ” चा सन्मान सन २०१५ – १६ मध्ये मिळविला .शाळेला गुणवत्तेच्या व सर्वांगीण विकासाच्या एका अत्युच्य शिखरावर नेऊन ठेवले . रुईच्या शाळेत व्यवस्थापक व ज्ञानदानाचे काम सलग बारा वर्षे करून या कर्मयोगाच्या या तपस्वी वारकऱ्यांने पुढे प्रयाण केले ते थेट दिनांक ८ जून २०१९ ते आजतागायत कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय विंचूर येथे प्राचार्य म्हणून .
२४ वर्षाचा माननीय प्राचार्य म्हणून प्रशासनाचा अनुभव असलेल्या माननीय देवढे सरांनी या शाळेत केलेला प्रवेश आणि त्याचवेळी ग्रामस्थांच्या पालकांच्या व मान्यवरांचा सहकार्यातून उभारलेल्या इमारतीचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते झाले .
प्रशासक म्हणून २४ वर्षाच्या अनुभवानुसार विंचूर विद्यालयाचा गुणवत्तापूर्ण कायापालट करण्याचा सरांनी जणू काही विडाच उचलला होता . सरांनी अनेक वेळा स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केले . पण शाळेतील विद्यार्थी विकासासाठी स्पर्धा परीक्षा ; स्कॉलरशिप परीक्षा ; आर टी एस ;एन टी .एस ; एन एम एम एस ; एलिमेंटरी ;इंटरमिजिएट ; एस .एस .सी व एच एस सी .बोर्ड परीक्षा या सर्व परीक्षांमध्ये उज्वल यश मिळविण्याचा प्रयत्न करून विद्यार्थी प्रगती साधली .
स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शाळेचा आरसाच बदलून टाकला . शाळेला चांगली शिस्त लावली . सन २०१९-२० मध्ये ७.५ लाख रुपयांचे क्रीडा अनुदानातून क्रीडांगण संरक्षण भिंतीचे काम पूर्ण केले . विद्यालयात माजी विद्यार्थ्यांकडून रुपये ७५ हजार किमतीचे ३५ ब्लॅकबोर्ड सर्व वर्गांमध्ये बसविण्यात आले . याच काळात जुन्या इमारतीची डागडुजी व रंगकाम पूर्ण केले . कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याचे बांधकाम व सुशोभीकरण पूर्ण केले . गट स्तरारावर रयत चषक क्रीडा स्पर्धेचे विद्यालयात उत्तम पद्धतीने आयोजन केले . तसेच शाळेत नवीन टॉयलेट व बाथरूमचे काम पूर्ण केले . इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेचे केंद्र त्यांच्या काळात चालू झाले . याचे सारे श्रेय प्राचार्य देवढे सरांना व त्यांना सहकार्य करणाऱ्या व्यवस्थापनाला द्यावे लागेल .
शाखेची गरज व विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन सरांचा इयत्ता अकरावी कॉमर्स शाखेची परवानगी घेण्याचा प्रयत्न सुरू आहे .
विंचूर गावात १९५९ रोजी रयत शिक्षण संस्थे अंतर्गत सुरू झालेले हे विद्यालय या चालू शैक्षणिक वर्षापर्यंत संस्थेच्या कर्मवीर पारितोषिकाच्या प्रतिक्षेत होते . प्राचार्य देवढे सरांचे सहकारी रयत शिक्षण संस्था सातारा आजीव सदस्य श्री चांदे आर . के व सर्व सेवकांच्या सहकार्यातून सलग चार वर्षे या पारितोषकाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करीत होते .
मात्र सर्वांच्या सहकार्याने व प्रचंड मेहनतीने प्राचार्य देवढे सरांच्या अचूक नियोजनामुळेच सन २०२३ – २४ यावर्षी संस्थेचे ” कर्मवीर पारितोषका ” चे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय विंचूर मानकरी ठरले . याचे सारे श्रेय – सर्व सेवक ; स्थानिक सल्लागार समिती ; स्थानिक स्कूल कमिटी ; शिक्षक – पालक संघ ; माता पालक संघ ; शाळा व्यवस्थापन व विकास समिती ; ग्रामस्थ ; पालक व विंचूर ज्ञानपंढरीचे भगीरथ माननीय प्राचार्य देवढे सरांना जाते .
प्राचार्य देवढे सरांनी नोकरीच्या सुरुवातीपासूनच आज पर्यंत शंभर टक्के कृतज्ञता निधी व कर्मवीर निधी देण्यात सहभाग नोंदविलेला आहे . सरांनी आतापर्यंत केलेल्या या उत्तम प्रशासनाची पोहचपावती म्हणून मानव स्पर्श सेवाभावी संस्था यांचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळालेला आहे . क्रीडा विभाग व पंचायत समिती निफाड यांच्या वतीने आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळालेला आहे . रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग अहमदनगर शंभर टक्के निकालामुळे सन्मानित केलेले आहे . ग्रामपंचायत वाकी यांनी आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार दिलेला आहे . तसेच महाराष्ट्र जंप रोप असोसिएशनचा पुरस्कार मिळालेला आहे .
मला वाटते सरस्वतीच्या या विद्यामंदिरात इतके स्वतःला वाहून घेतल्यामुळेच की काय सरांची दोन्ही मुले – मुलगा व मुलगी दोघेही अतिशय संस्कारीत असून उच्च शिक्षण घेत आहेत .
शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रात गेले २९ वर्ष प्राचार्य म्हणून काम करीत असताना सरांनी आपला प्रामाणिकपणा ; चिंतनशील वृत्ती ; अविरत परिश्रम ; उपक्रमशीलता आणि सृजनशीलता यामुळे एक शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन सुद्धा शिक्षणाच्या या ज्ञान पंढरीत आपण आदर्शवत कार्य करीत आहात . आपल्या या चांगल्या कार्याची आठवण सदैव स्मृतीत राहावी म्हणून ;
कवी कुसुमाग्रजांच्या शब्दात सांगायचे झाल्यास ;
” हजार ह्हदय गहिवरली
तर मन आमुचे गहिवरते ;
असे हजारासंगे आहे
जडलेले आमुचे नाते . “
सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन रुई व विंचूर येथील दोन्ही शाळांना रयत शिक्षण संस्थेचा आदर्श “कर्मवीर पुरस्कार ” मिळवून देणाऱ्या प्राचार्य देवढे नंदकुमार एकनाथ यांना पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा !!!
भाऊसाहेब महाडदेव
(लेखक – विंचूर येथे कर्मवीर भाऊराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय विंचूर येथे कार्यरत आहेत )