Breaking
गुन्हेगारी

गोवा बनावटीची विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या विरोधात धडक कारवाई

2 कोटी 26 लाख 65 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त

0 4 2 9 5 7

नाशिक – मिळालेल्या गुप्त बातमीनुसार सिन्नर नाशिक रोडवर शिंदे पळसे टोल नाक्याजवळ शिंदे गाव येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार वाहन तपासणी सापळा रचला असता आज दिनांक दोन रोजी संशयित एक टाटा कंपनी निर्मित 2518 मॉडेल चे दहा चाकी वाहन तपासणी कमी थांबवले असता सदर वाहनाच्या पुढील दर्शनी बाजूस आर जे 14 जी एफ 3019 असा प्रादेशिक परिवहन क्रमांक नमूद होता. सदरचे वाहनांमध्ये पर राज्यातील गोवा बनावटीच्या विदेशी मध्याच्या रॉयल ब्ल्यू व्हिस्की 180 मिली क्षमतेच्या एकूण 96000 सीलबंद बाटल्या 2000 बॉक्स मध्ये आढळून आल्याने वाहन चालक मांगीलाल रामकिसन वय 30 वर्ष राहणार खिलेरी वास मगरा चोहटन बारमेर राजस्थान याचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला सदरील परराज्यातील गोवा बनावटीचे विदेशी मध्य आणि तो मध्य साठा वाहतूक करणारे टाटा कंपनी चे वरील क्रमांकाचे दहा चाकी वाहन असा एकूण रुपये दोन कोटी 26 लाख 65 हजार रुपये किमतीचा मध्यमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त श्रीमती उषा वर्मा मॅडम, अधीक्षक संतोष झगडे उपाधीक्षक सुअ तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक क्रमांक एक चे निरीक्षक विलास बामणे दुय्यम निरीक्षक गणेश नागरगोजे, संजय सावंत, सदुनी पी वाय गायकवाड, जवान सर्वश्री दीपक आव्हाड अमित गांगुर्डे संदीप देशमुख व्ही ए चव्हाण, सागर पवार अमन तडवी महिला जवान अनिता भांड यांनी सर्वांनी मिळून यशस्वीरित्या पार पाडली. सदर गुन्ह्याचा तपास गणेश नागरगोजे करीत आहेत.
अवैध मद्य निर्मिती विक्री वाहतूक या बाबत तक्रारीसाठी मो क्र. 8422001133

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे