Breaking
धार्मिकब्रेकिंगसामाजिक

ऐन नवरात्रात सप्तश्रुंगी गडावर शुकशूकाट

0 4 2 9 5 7

सोमनाथ मानकर सप्तशृंगी गड

साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ  श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरती यावर्षी पावसाचा फटका सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थ आणि भाविकांना बसला त्याचे कारण म्हणजे सर्वत्र महाराष्ट्रमध्ये असलेला परतीचा पाऊस. या वर्षी सप्तमीला दिवसभर गाभारा व सभामंडपा व्यतिरिक्त इतरत्र भाविकांची कुठेही गर्दी नव्हती. मंगळवारी (ता. ३०) रोजी पाऊस काहीअंशी थाबला  होता. धुकेही ओसरले होते मात्र; पावसाचे वातावरण कायम होते.  यामुळे भाविकांची थोड्या फार प्रमाणात घोळके गडाकडे दिसून लागले. मात्र नेहमी प्रमाणे सप्तमी अष्टमीला असणारी गर्दी मात्र दिसेनासी होती. गडवासियांसाठी कोविडचा काळ अपवाद वगळता हे दृश्य नवीनच होते.

मंगळवारी, (ता. ३०) रोजीची पंचामृत महापूजा विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम व सह धर्मादाय आयुक्त विवेक सोनूले यांनी सपत्नीक केली. यावेळी श्री भगवतीस हिरव्या रंगाचे भरजरीचे महावस्त्र नेसविण्यात आले होते. यासह उत्सव कालावधीतील अलंकार परिधान करण्यात आले होते. दुपार सत्रात श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या मुख्यकार्यालयात दुर्गाष्टमी निमित्त श्री भगवतीच्या उत्सव मूर्तीची विधिवत पूजा व आरती विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभय लाहोटी यांनी केली. तसेच दर महिन्याच्या अष्टमीला सप्तशृंगी गडावरती आई भगवती च्या पालखीचे मिरवणूक होती तशीच मिरवणूक आज  ट्रस्टच्या कार्यालयातून नगरप्रदक्षिणा पालखीस प्रारंभ झाला. त्यानंतर शिवालय तलाव व पहिली पायरी येथेही या पालखीची पूजा व आरती करण्यात आली. यावेळी तहसीलदार तथा विश्वस्त रोहिदास वारुळे, ट्रस्टचे  व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे आदींसह कर्मचारी उपस्थित होते. दुपार सत्रात दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी श्री भगवतीची सपत्नीक संकल्प आरती केली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभय लाहोटी, मुंबई उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक आडकर, यादव सर, विश्वस्त अॅड ललित निकम, मनज्योत पाटील उपस्थित होते.

आई भगवतीच्या शिखरावरती लागणारा ध्वज  बुधवारी (ता. १) महानवमी निमित्त ट्रस्टच्या मुख्यकार्यालयात दुपारी ३.३० वाजता श्री भगवतीच्या कीर्तीध्वजाची पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभय लाहोटी यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न होईल. या प्रसंगी किर्तीध्वजाचे मानकरी गवळी परिवार यासह ट्रस्टचे विश्वस्त मंडळ प्रतिनिधी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संपन्न होईल. त्यानंतर कीर्तीध्वज मिरवणुकीस सुरवात होईल. बुधवारी मध्यरात्री सप्तशृंग शिखरावर ध्वज मानकरी गवळी परिवार यांच्या हस्ते  देवीचा कीर्तीध्वज फडकविण्यात येईल. त्यानंतर बुधवारी सायंकाळी ५ वाजता श्री भगवती मंदिरात शतचंडी याग  होमहवन पूजेस विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश अभय लाहोटी यांच्या पूजेस सुरवात होईल. गुरुवारी या शतचंडी यागाच्या पूर्णाहुतीने शारदीय नवरात्रोत्सवाची समाप्ती होईल.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे