गुन्हेगारीब्रेकिंग
विंचूरच्या धान्य व्यापाऱ्याकडून 25 लाखांचा मुद्देमाल जप्त ;
लासलगाव पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
0
4
2
9
5
7
लोकशास्त्र न्यूज : विंचूरच्या धान्य व्यापाऱ्याकडून 25 लाखांचा मुद्देमाल जप्त ;
लासलगाव पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
[28/09, 3:20 pm] लोकशास्त्र न्यूज: विंचूर
पोलीस हवालदार सचिन धारणकर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून लासलगाव पोलिसांनी विंचूर येथील धान्य व्यापारी राहुल राजेंद्र कर्पे यांच्या कडून सुमारे 25 लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतल्याची कारवाई आज पहाटेच्या सुमारास केली.
विंचूर नाशिक रोडवर देवकी लॉन्स शेजारील गोडावून वर ही कारवाई करण्यात आली. यावेळी
राहुल कर्पे यांच्याकडील 15 लाखाचा आयशर टेम्पो, 3 लाख 60 हजार रु किमतीचे तांदूळ चे 200 पोते, दोन हजाराचा वजन काटा, 6 लाखांची पिकअप, 45 हजारांचे गव्हाचे 45 पोते, असा एकूण 25 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
सवलतीच्या दरात दिले जाणारे तांदूळ आणि गहू अन्य जिल्ह्यात पाठविले जात असल्याच्या संशयावरुन ही कारवाई करण्यात आली असून याबाबत राहुल राजेंद्र कर्पे (रा. पांडुरंग नगर, विंचूर ) यांच्यावर गु. र. नं.220/2025 जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3 व 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली psi साळुंके व पो. हवा. निचळ करीत आहेत.
0
4
2
9
5
7


