Breaking
शासकीय

सापडलेल्या बालकांच्या पालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

0 3 2 1 2 3

नाशिक, दिनांक 18 जुलै, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) : महिला व बाल कल्याण समिती नाशिक मार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत बालगृहामध्ये काळजी व संरक्षणाची गरज असलेली बालके दाखल केली जातात. सदर बालकांची ओळख पटवून संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनिल दुसाणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

असा आहे बालकांचा तपशील


1. कुमारी सौम्या, वय 15 दिवस ही बालिका 27 मे, 2024 रोजी अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत धन्वंतरी मेडिकल कॉलेज, अंबड येथील बसस्टॉपवर सदर बालिका विनापालक आढळून आली. बालिकेच्या पालकांचा शोध पोलिसांनी घेतला असता कुणीही मिळून न आल्याने बालिकेस 27 मे 2024 रोजी बाल कल्याण समितीच्या आदेशान्वये बालिकेस सौम्या नाव देवून आधाराश्रम संस्था, घारपुरे घाट, नाशिक संस्थेत दाखल केले आहे.

2. कुमार संकेत, वय 11 दिवस हा बालक 2 जुन, 2024 रोजी मोखाडा जि. पालघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुपारी 2.00 वाजता निळमाती घाटात रस्त्याच्या कडेला एका लाल व पांढरे पट्टे असलेले कपड्यात गुंडाळलेल्या स्थितीत एका पुरुष जातीचे बालक विनापालक आढळून आला. बालकाच्या पालकांचा शोध पोलिसांनी घेतला असता कुणीही मिळून न आल्याने त्यास जिल्हा शासकीय रुग्णालय, नाशिक येथे दाखल केले होते. डिस्चार्ज केल्यानंतर 11 जून, 2024 रोजी बाल कल्याण समितीच्या आदेशान्वये बालकास संकेत नाव देवून आधाराश्रम, घारपुरे घाट, नाशिक संस्थेत दाखल केले आहे.

या दोन्ही बालकांच्या भविष्याचा विचार करता कुमारी सौम्या व कुमार संकेत याच्या पालकांनी आधाराश्रम संस्था, घारपुरे घाट, नाशिक येथे 0253-2580309, 2950309 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष नाशिक, समाज कल्याण आवार, नाशिक पुणे रोड, नासर्डी पुलाजवळ, नाशिक 0253- 2236368 या ठिकाणी संपर्क साधावा.

माहिती प्रसारणाच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत बालकांचा दावा करण्यास कोणी आले नाही तर बालकांना पालक नसल्याचे गृहीत धरून पुढील पुनर्वसनाचा विचार करण्यात येणार असल्याचेही पत्रकात नमूद केले आहे.
00000

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे