Breaking
ब्रेकिंगराजकिय

लासलगाव अप्पर तहसील कार्यालयाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

0 4 2 9 5 7

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लासलगाव येथील उद्यान व अंगणवाडीचे लोकार्पण

लासलगाव अप्पर तहसील कार्यालयाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

मतदारसंघातील प्रलंबित कामे लवकरच मार्गी लावले जातील – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

लासलगाव, दि.३० मार्च :- लासलगाव येथे अप्पर तहसील कार्यालयासाठी आपले महसूल विभागाकडे पाठपुरावा सुरू असुन महसूल मंत्र्यांनी हे कार्यालय लवकरच मंजूर केले जाईल असे आश्वासित केले आहे. त्यामुळे लवकरच लासलगाव येथील अप्पर तहसील कार्यालयाचा प्रश्न मार्गी लागेल तसेच एक ते दीड महिन्यात अग्निशामक वाहनाचा प्रश्न मार्गी लागेल तसेच मतदारसंघातील प्रलंबित राहिलेली विकास कामे लवकरच मार्गी लावली जातील असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

लासलगाव येथील उद्यान व अंगणवाडीचे लोकार्पण राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार कल्याणराव पाटील, बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, नानासाहेब पाटील, ज्ञानेश्वर जगताप, सुवर्णाताई जगताप, डॉ.श्रीकांत आवारे, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब बोचरे, सरपंच योगिता पाटील, उपसरपंच रामनाथ शेजवळ, माजी सरपंच अफजल शेख, सदस्य चंद्रशेखर होळकर, संतोष पलोड, बालेश जाधव, बबन शिंदे, डॉ.विकास चांदर, दत्ता पाटील, अमोल थोरे, अमिता ब्रम्हेचा, अश्विनी बर्डे, स्वप्नील डुंगरवाल, महिला बालकल्याण विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रतापराव पाटील, गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, सहायक गटविकास अधिकारी सुनील पाटील, ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी गुढी पाडावा व मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, लासलगाव परिसरातील नागरिकांच्या मागणीनंतर आमदार पंकज भुजबळ व आपल्या निधीतून अत्याधुनिक अग्निशामक वाहन आपण देणार आहोत. या अग्निशामक कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी लासलगाव बाजार समितीच्या माध्यमातून हा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, लासलगाव विंचूर खेडलेझुंगे या रस्त्याचे चौपदरीकरण काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. त्याचबरोबर पिंपळस ते येवला रस्ता, लासलगाव बाह्य वळण रस्ता, लासलगाव उपजिल्हा रुग्णालय कामे करण्यात येत आहे. तसेच अभ्यासिकेचे काम झाले असून लासलगाव येथे अप्पर तहसील कार्यालय येथे आणण्यासाठी आपले प्रयत्न असून लवकरच हे कार्यालय मंजूर होईल असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, लासलगाव सह सोळा गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी योजनेचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे येथील पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. यापुढील काळातही योजना यशस्वीरित्या चालण्यासाठी योग्य ते नियोजन करून सर्वांनी एकत्र येऊन काम करावे असे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले की, आज लोकार्पण करण्यात आलेल्या उद्यान, ग्रीन जिम, अंगणवाडी, क्रीडांगण यासह विविध सुविधाचा नागरिकांनी लाभ घ्यावा. तसेच हे सुस्थितीत राहण्यासाठी प्रशासनाने काम करावे अशा सूचना त्यांनी केले. यावेळी माजी आमदार कल्याणराव पाटील, बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर सुवर्णाताई जगताप, सरपंच योगिता पाटील, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे