लासलगाव पोलिसांनी जप्त केली कत्तलीसाठी जाणारे सात जनावरे
शरद लोहकरे, लासलगाव…
कत्तलीसाठी जाणारे सात गोवंश जनावरे, पीकअप सह २ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त
लासलगाव पोलिसांनी पाठलाग करीत कत्तलीसाठी जाणारे सात जनावरे व एक पिकअप सह २ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अज्ञात आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा व प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लासलगाव पोलीस ठाण्यात पो.शि.सागर सुर्यभान आरोटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवार दि.२८ पहाटे ६ वाजेच्या सुमारास विंचुर बस स्थानकासमोर येवला ते निफाडकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक महिंद्रा कंपनीची सफेद रंगाची पिकअप गाडी तिचे टपावर मराठीत बुर्राक असे नाव लिहिलेले, बोनेटवर इंग्रजीत मिर्झापुर व दोन्ही बाजुस इंग्रजीत रॉकेट असे लाल अक्षरात लिहीलेल्या एम.एच.०४ इ.एल.३५५४ क्रमांकाची एक पिकअप संशयास्पद अवस्थेत आढळून आली. तिचा पाठलाग केला असता त्या गाडीत लाल काळी गाय मयत अवस्थेत आढळून आली व इतर ६ गाई व एक गोऱ्हा हे निर्दयपणे त्यांना यातना, इजा होईल अशा पद्दतीने दोरीच्या सहाय्याने आखुड बांधुन ठेवलेले दिसले. तेव्हा आमची खात्री झाली की, सदरच्या वाहनावरील चालक हा वाहनामधील जनावरे ही कत्तल करण्याचे उद्देशाने विना परवाना वाहतुक करताना मिळुन आले म्हणुन अज्ञात चालकाविरुद्द गु.रजि. क्रमांक ३३३/२०२४ प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० ११(१), (अ)(ब), महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा, १९७६ ५ अ(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून स.पो.नि.भास्कर शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हवा.बी.बी.कांदळकर अधिक तपास करीत आहेत.