विंचूर विद्यालयाचे स्कॉलरशिप परीक्षेत यश
विंचूर – येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शासनामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी स्कॉलरशिप परीक्षेत उत्तुंग यश प्राप्त केले असून विद्यालयातील इयत्ता पाचवीचे दोन व इयत्ता आठवीच्या दोन विद्यार्थ्यांची स्कॉलरशिपसाठी निवड झाली आहे.
पाचवी च्या युगांत पंकज सरोदे व सुक्ती योगेश जगदाळे तसेच इयत्ता आठवी चे भाग्यश्री राजेंद्र दरेकर व देवयानी मंगेश सोनवणे या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत निवड होऊन ते स्कॉलरशिपसाठी पात्र झालेले आहेत. विद्यालयामार्फत राबविल्या जाणार्या गुरकुल प्रकल्पांतर्गत सदर विद्यार्थ्यांना विद्यालयात मार्गदर्शन करण्यात आले.
सदर विद्यार्थ्यांना इयत्ता 8 वी विभाप्रमुख पवार ए.ए. व विषय शिक्षक भोसले व्ही.सी, खरात ए.जी, वानखेडे ए.एस, पवार ए.ए., सावळे ए.वाय यांनी मार्गदर्शन केले. व इयत्ता 5वी विभागप्रमुख सोनवणे जे. बी. व विषय शिक्षक, भोये आर. आर., निकम के एम, पवार ए एम, शिंदे जे एस, चीतुडकर ए डी. यांनी मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक, मार्गदर्शक शिक्षक व विभागप्रमुख यांचे रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, जनरल बॉडी सदस्य डॉ. सुजित गुंजाळ ,उत्तर विभागीय सल्लागार मंडळाचे सदस्य सुनील मालपाणी, विभागीय अधिकारी व सहाय्यक विभागीय अधिकारी, स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ दरेकर यांनी अभिनंदन केले.