Breaking
कृषीवार्तागुन्हेगारीब्रेकिंगसामाजिक

अंगणात गाय गेल्याच्या कारणावरून हाणामारी

लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0 3 2 1 2 3

शरद लोहकरे, लासलगाव…

अंगणात गाय गेल्याच्या कारणावरून दोघा साडू व बहिणीत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली असून आरोपी साडू व मेव्हणीच्या विरोधात लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत बापु चंद्रभान सोनवणे वय ४५ रा. खेडलेझुंगे यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत, फिर्यादी व आरोपी भाऊसाहेब मारुती गोधडे, सुनिता भाऊसाहेब गोधडे रा.खेडलेझुंगे हे नात्याने साडू व मेव्हणी आहेत. ते एकमेकांच्या शेजारी राहतात. दि.२९ जाने रात्री १० च्या सुमारास फिर्यादी व त्यांची पत्नी मुलाबाळांसोबत ओट्यावर झोपले असताना फिर्यादीची गाय आरोपीच्या ओट्यावर गेली. तेव्हा आरोपी भाऊसाहेब गोधडे म्हणाला की, तुझी गाय नीट बांध’ यावर फिर्यादी, ते मुके जनावर आहे’ असे म्हणाला. याचा राग येऊन आरोपी भाऊसाहेब व सुनीता यांनी संगनमताने घराचे शेजारी पडलेली काठी उचलून भाऊसाहेब याने काठीने फिर्यादीच्या डोक्यात मारून दुखापत केली व सुनीता हिने पण तिचे हातातील काठीने फिर्यादीच्या दोन्ही पायावर, पाठीवर, खांदयावर मारुन दुखापत केली. फिर्यादीची पत्नी आशा हि सोडविणेस आली असता, तिला व फिर्यादीस शिवीगाळ करुन हाताचे चापटीने मारहाण करुन, ‘पुन्हा जर आमचे नादी लागुन पोलीस ठाणेस तक्रार दिली तर तेथून आल्यानंतर तुमचा बेत पाहू’ अशी धमकी दिली असे म्हटले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून सदर आरोपींच्या विरोधात लासलगाव पोलीस ठाण्यात गु.र.न ४२/२०२५ भारतीय न्या.संहिता ११८ (१) ११५ (२) ३५२, ३५१ (२) ३५१(३) ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स.पो.नि.भास्करराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पो.हवा.संदीप शिंदे अधिक तपास करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे