Breaking
आरोग्य व शिक्षणनोकरीशैक्षणिक

विद्यार्थ्यांनी दाखवली आपल्यातील भावी वैज्ञानिकाची चुणूक 

0 3 2 1 2 3

विद्यार्थ्यांनी दाखवली आपल्यातील भावी वैज्ञानिकाची चुणूक 

किरण घायदार, नाशिक ( प्रतिनिधी )- रोटरी क्लब ऑफ नासिकरोड आणि लायन्स क्लब ऑफ नाशिक कर्मवीर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी एका आंतरशालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी अतिशय नावीन्यपूर्ण कल्पना सादर करून आपल्यातील भावी वैज्ञानिकाची चुणूक दाखवून दिली. विविध आकर्षक प्रकल्प शालेय चमूंनी साकारले. शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञानाची आवड निर्माण व्हावी, कल्पकतेला वाव मिळावा, चांगले वैज्ञानिक तयार व्हावेत तसेच सर्वांगीण विकासाला चालना मिळावी या उद्देशाने आंतरशालेय विज्ञान प्रकल्प स्पर्धा आयोजित करण्यात आली. रविवार दि.२ फेब्रुवारी रोजी माहेश्वरी भुवन, नाशिकरोड येथे सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत झालेल्या या उपक्रमात इयत्ता आठवी व नववीतील विद्यार्थी उत्साहात सहभागी झाले. रोटरी क्लब ऑफ नासिकरोडचे अध्यक्ष ओ.पी. श्रीवास्तव आणि लायन्स क्लब ऑफ नाशिक कर्मवीरचे अध्यक्ष सुरेंद्र मिश्रा यांनी स्वागत, प्रास्ताविक केले.  प्रमुख पाहुणे म्हणून मेजर जनरल सायरस पिठावाला, प्रा. डॉ. वसंत बर्वे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधून प्रेरणा दिली. २० पेक्षा अधिक शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आकर्षक पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. सौमित्री दास, डॉ. विक्रांत किवंडे, श्रीकांत पगारे, विकास दिघे, कुणाल शर्मा, तुषार म्हस्के, ॲनेट जहांगीर, दिलीप दिघे, ॲड. दिनेश शिंदे, विभा पाटील, डॉ. रोचना शर्मा, आर. के. श्रीवास्तव, महेश साळवे, मनिष मिश्रा, प्रेमलता शर्मा या अनेक पदाधिकाऱ्यांनी तसेच सहकाऱ्यांनी उपक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

या शाळांच्या विद्यार्थ्यांनी पटकावली पारितोषिके

विविध गटात भोसला मिलिटरी स्कूल 

( मुली ), संत होलीबाबा विद्यालय, आदर्श माध्यमिक विद्यालय, नूतन विद्यालय (वावी ), केंद्रीय विद्यालय (नेहरुनगर ), विद्या प्रशाला ( तळेगाव ) या शाळांच्या विद्यार्थ्यांनी पारितोषिके पटकावली. त्यांना पारितोषिकांसह प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. भोसला स्कूलच्या विद्यार्थीनींनी दोन वेगवेगळ्या गटांत पारितोषिके मिळवली. डॉ.रिकी मर्चंट, राजीव सिंघ, मनिषा विसपुते, सृष्टी शिंदे यांनी प्रकल्पांचे परिक्षण केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे