Breaking
आरोग्य व शिक्षणदेश-विदेशनिवडब्रेकिंगशैक्षणिक

डीपीएस नाशिकमध्ये सीबीएसई इयत्ता 10वी व 12वीच्या अभूतपूर्व निकालाचा जल्लोष

0 3 2 1 2 3

डीपीएस नाशिकने सीबीएसई बोर्ड परीक्षा 2024-25 मध्ये विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा जल्लोष साजरा करत उत्कृष्टता, चिकाटी आणि यशाचा केला गौरव

 नाशिक, 16 मे 2025- शैक्षणिक गुणवत्ता आणि सर्वांगीण विकासाच्या परंपरेला पुढे नेत, दिल्ली पब्लिक स्कूल, नाशिकने (डीपीएस,नाशिक) इयत्ता 10वी आणि 12वीच्या सीबीएसई बोर्ड परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या अभूतपूर्व यशाची अभिमानपूर्वक घोषणा केली आहे. भविष्यातील जागरूक नागरिक घडवण्याचा निर्धार बाळगणाऱ्या या शाळेच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम, सातत्य आणि समर्पणाच्या जोरावर आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

इयत्ता 10वीमध्ये आकृती गुळवे आणि मयुख वोरा यांनी 98.17% गुणांसह शाळेतील पहिला क्रमांक पटकावला. यंदा 17 विद्यार्थ्यांनी 95% पेक्षा जास्त तर 53 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण मिळवले. विशेष बाब म्हणजे फ्रेंच आणि संस्कृत विषयात प्रत्येकी 3 विद्यार्थ्यांनी, तर माहिती तंत्रज्ञानात तब्बल 13 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत. इंग्रजीमध्ये 8, गणितात 7, माहिती तंत्रज्ञानात 9, तर विज्ञान, सामाजिक शास्त्र व मराठीत प्रत्येकी एका विद्यार्थ्याने 99 गुण मिळवले.

इयत्ता 12वीमध्ये सायन्स, कॉमर्स आणि ह्युमॅनिटीज या तिन्ही शाखांतील विद्यार्थ्यांनी अपूर्व यश मिळवून शाळेचा गौरव वाढवला आहे. सायन्स विभागात हिरल चंदक हिने 98.6% गुणांसह टॉप केले, कॉमर्समध्ये सच बलवानी याने 91.8%, तर ह्युमॅनिटीजमध्ये लक्ष्मी नांबियार हिने 97.4% गुणांसह सर्वोच्च स्थान पटकावले. यंदा 8 विद्यार्थ्यांनी 95% पेक्षा अधिक, तर 24 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण मिळवले. इन्फॉर्मेशन प्रॅक्टिसेसमध्ये 3, फाइन आर्ट्स, पॉलिटिकल सायन्स, फिजिकल एज्युकेशन आणि फिजिक्स या विषयांमध्ये प्रत्येकी एका विद्यार्थ्याने 100 टक्के गुण मिळवले.

 या अभूतपूर्व निकालाचे श्रेय डीपीएस नाशिकच्या प्राचार्या, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांना जाते. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या विद्यार्थ्यांनी कोणतेही खासगी क्लासेस न लावता हे यश केवळ शाळेतील मार्गदर्शनावर मिळवलं आहे.

प्राचार्या श्रीमती शिल्पा अहिराय यांनी सांगितले की, “हा निकाल आमच्या शाळेच्या शैक्षणिक उत्कृष्टतेच्या आणि विद्यार्थीनिष्ठ शिक्षणपद्धतीच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. आमच्या विद्यार्थ्यांनी फक्त शैक्षणिकदृष्ट्या नव्हे तर प्रामाणिकपणा आणि चिकाटी यांतही सर्वोत्तम आदर्श ठेवला आहे.”

विभागीय समन्वयक श्रीमती जयश्री पाटील म्हणाल्या, “आम्हाला आमच्या युवा प्रतिभावंतांचा खूप अभिमान आहे. आमच्या विद्यार्थ्यांच्या या यशाने समग्र शिक्षणपद्धतीवरचा आमचा विश्वास अधिक दृढ झाला आहे, जिथे जिज्ञासा, जबाबदारी आणि आत्मविश्वासाच्या बळावर भविष्य घडवलं जातं.”

संचालक श्री सिद्धार्थ राजगढिया यांनी सांगितले की, “डीपीएस नाशिक येथे प्रत्येक विद्यार्थ्याला यशस्वी मानसिकता विकसित करून घडवलं जातं. हे निकाल शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यातील सशक्त सहकार्याचे मूर्त स्वरूप आहेत. आम्ही समर्पण, दृढनिश्चय आणि गतिमान शिक्षणाच्या माध्यमातून उद्याचे उज्वल आणि जागरूक नागरिक घडवत आहोत.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे