आरोग्य व शिक्षणशैक्षणिक
शासकीय तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत विंचूरच्या कर्मवीर महाविद्यालयाचे घवघवीत यश

0
5
1
7
3
0
*शासकीय तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे घवघवीत यश*
तालुकास्तरीय क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी; अनेक खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
दिनांक 23 व 24 सप्टेंबर 2026 नूतन कॉलेज लासलगाव येथे झालेल्या शासकीय तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत ज्युनिअर कॉलेज विभागाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विविध क्रीडा प्रकारांत यश संपादन केले. मैदानी क्रीडा स्पर्धेत ज्युनिअर कॉलेज विभागाने तब्बल १३ क्रीडा प्रकारांत विजय मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली. जाधव रुशिना, सांगळे सिद्धी, गुरसळ दुर्गा, वैराळ दिव्या, मुदगुल प्रीती, माळी सुमित, बर्डे ओम, सय्यद रेहान, जेउघाले प्रणव, गोतरणे तुषार, देहर्डे मयूर, चव्हाण प्रतीक, गुजर ऋषिकेश, माळी अलोक, बर्डे कार्तिक, माळी खुशबू, जाधव टीना, माळी गायत्री, पवार प्रतिभा, गवळी पूनम, ढमान रोशनी, मोमीन निदा, पवार समाधान, गोधडे ओम, घुले तनुजा, जाधव तृप्ती, भडांगे कृष्णा या विद्यार्थ्यांनी घवघवीत असे यश संपादन केले. या स्पर्धांमध्ये एकूण 15 क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तसेच 18 विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. तर तृतीय क्रमांक एकूण 09 विद्यार्थ्यांनी मिळवून दिले. 33 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. या यशाबद्दल संस्थेचे व्हाईस चेअरमन भगीरथ काका शिंदे, जनरल बॉडी सदस्य डॉ. सुजितजी गुंजाळ, रयत शिक्षण संस्था, सातारा मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य राजेंद्रजी चांदे, विद्यालयाचे मार्गदर्शक प्राचार्य नंदकुमार देवढे, उपमुख्याध्यापक वाबळे एस. एम., पर्यवेक्षक ठाकरे जे. एन. व माळी एस. टी., ज्युनिअर कॉलेज विभाग व क्रीडा प्रमुख तसेच कर्मवीर सैन्य पोलीस भरती अकॅडमी प्रमुख प्रा.राजेंद्र टिळेकर, गायकवाड मॅडम, कु. घायाळ मॅडम, महाडदेव सर , बैरागी सर,श्रीम.अहिरे मॅडम,काशीद सर ,पवार सर, पाटील सर व ज्युनिअर कॉलेजच्या सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
0
5
1
7
3
0



