Breaking
सामाजिक

रोटरी क्लब मिड टाऊनतर्फे नाटकातून सामाजिक संदेश

0 3 2 1 2 5

नाशिक (किरण घायदार)…

माणसाने सकारात्मक जीवन जगावे व येणारे अडथळे चतुराईने दूर करावे हा संदेश विनोदी नाटकातून हसत खेळत देण्यात आला. रोटरी क्लब ऑफ नाशिक मिड टाऊन तर्फे स्वामीनी थिएटर्स निर्मित ऋषिकेश हराळ लिखित ‘नाना थोडा थांबा ना…’ या दीर्घांकिकेचा प्रयोग काल कालिदास कलामंदिरात सादर करण्यात आला. त्याला प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
क्लबचे अध्यक्ष ऍडव्होकेट अजय जाधव यांनी प्रास्ताविकात निधी संकलनासोबतच रोटरीशी संलग्न सर्व व्यक्ती व संस्थांनी एकत्र येऊन नाटकाचा आस्वाद घेणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. रोटरी क्लब नासिक मिड टाऊनतर्फे वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात असे त्यांनी नमूद केले. या सर्व उपक्रमांसाठी निधी संकलनाकरता या विनोदी
नाटकाचे आयोजन केले होते. नाटकाला नाशिक रोटरी परिवाराने तसेच रोटरीशी संलग्न विविध संस्थांनी भरपूर प्रतिसाद दिला.
नाटकाचा विषय कौटुंबिक जिव्हाळा व सामाजिक समस्येवर विनोदी अंगाने नेमके बोट ठेवणारा होता. निवृत्त पित्याच्या पेन्शनवर विसंबून नाकर्त्या झालेल्या मुलांनी पेन्शनच्या रक्कमेवर डोळा ठेवून लढवलेल्या हिकमतींवर करारी बाप कसा पुरून उरतो हे विनोदी पद्धतीने सांगत सामाजिक संदेश दिला. नाटकाचे
दिग्दर्शन राज्य नाट्यस्पर्धेचे तीन वेळा पारितोषिक विजेते कलाकार व क्लबचे माजी अध्यक्ष दिलीप काळे यांनी केले. नेपथ्य- समाधान मुर्तडक, प्रकाशयोजना – कृतार्थ कंसारा आणि संगीत – ओम देशमुख यांनी दिले . कलाकारांमध्ये स्वतः दिग्दर्शक दिलीप काळे यांच्यासह भूषण गायकवाड, सुनील गांगुर्डे, ओम पऱ्हे, नयना सनान्से, प्रियांका सिंह, मधुरा तरटे, पूजा घोडके, समाधान मुर्तडक, आनंद गांगुर्डे यांचा समावेश होता. सर्व कलाकारांनी उत्तम भूमिका करुन प्रेक्षकांना खिळवून ठेवले व हसत हसत अंतर्मुख केले.

5/5 - (1 vote)

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे